भारतीय लोकनृत्य : कृष्णाट्टम साधारणपणे १७व्या शतकामध्ये कृष्णाट्टम या परंपरेचा जन्म झाला.कृष्णाट्टम ही भारतातील केरळमधील, एक मंदिर कला आहे. हे एक नृत्य नाटक आहे.उत्तर केरळमधील कालिकतचा तत्कालीन झामोरीन राजा ‘मनवेद’ यांनी ही निर्मिती केली आहे. राजा मनुवाद्यांनी ‘कृष्ण गीती’ याचीही रचना केली जे ‘कृष्णाट्टम’ या लोकनाट्यातील विशेष अंग आहे. उत्तर केरळमध्ये असणारे ‘गुरुवायुर’ या कृष्ण मंदिरांमध्ये दरवर्षी हे नृत्य नाटक सादर केले जाते.यामधील सहभागी कलाकार हे विशिष्ट नायर परिवारातील असतात. अनेक शतकापासून ठराविक वेषभूषा आणि रंगभूषा या नाट्यशैलीला विशेष महत्त्व प्रदान करत आहेत. यावेळी वातावरण भक्तियुक्त असते.कृष्णाट्टमचे अवतारम, कालियामर्दन, रासक्रीडा, कंसवधम, स्वयंवरम, वाण युद्धम, विविध वधम व स्वर्गारोहण हे आठ अंग आहेत. परंपरेनुसार कृष्णाट्टमची सुरुवात दीप प्रज्वलन आणि वाद्य वादनाने होते. मद्यलम, मंजीरा आणि इतर तालवाद्याच्या वादनानंतर दोन कलाकार विविध रंगीत पडद्याच्या बरोबर मंचावर येतात. पडद्यामुळे रंगमंचाचा आभास होतो. तसेच पडद्यांमुळे कलाकारांचे चेहरे आणि पाय फक्त दिसतात. तोट्ट्यम म्हणजेच सुरुवातीनंतरच मुख्य कार्यक्रम सुरू होतो. मंचावर सजविण्यासाठी पडद्याशिवाय एक-दोन लाकडी चौकट व खुर्च्या असतात. कृष्णाट्टमचे प्रथम अंग ‘अवतारम’ यामध्ये भगवान कृष्ण यांच्या जन्माची कथा सादर केली जाते. पारंपरिक कथा अनुसार भुदेवी यांना या नाट्यशैलीसाठी विशेष ध्यान दिले गेले आहे. त्यांनी पृथ्वीवरील पाप आणि वाईट कृत्य नष्ट करण्यासाठी परमेश्वराचे आवाहन केले. सर्व देवतांनी मिळून हा निर्णय घेतला की भगवान विष्णू यांनी कृष्णाच्या अवतारामध्ये पृथ्वीवर मनुष्य रूपात जाऊन पृथ्वीवरील वाईट कृत्य आणि पाप यांचा नाश करावा. या कथेचे सादरीकरणकेले जाते. कृष्णाट्टममधील कलाकार या पूर्वकथेचे मंचनमुद्रा, अभिनय आणि संगीताद्वारे सादरीकरण करतात. कृष्णलीलेची सुरुवात बाळकृष्णाचे विविध खेळ, हट्ट आणि विनोदाने होतो. असं मानलं जातं की संतान विरहित दांपत्य या कृष्ण लीलांचे सादरीकरण पाहिल्यानंतर संतान प्राप्त करू शकतात. अवतारम याच्या पूर्वकथेमध्ये वासुदेव भगवान कृष्ण यांना यशोदा आणि नंदगोप यांच्याकडे सोपवितात. यशोदा आणि गोप गोपी या नाट्याच्या पूर्व कथेमध्ये बाळकृष्णसोबत विविध खेळ, नृत्य-गायन करतात. कृष्णाट्टमच्या द्वितीय चरणामध्ये ‘कालियामर्दनम्’, कृष्ण लीला व बाळकृष्ण क्रीडा चालूच असतात. भगवान कृष्ण पक्षीरुपी राक्षस, बकासुर यांच्याशी युद्ध करून त्याला मारतात.’कृष्णाट्टम’ यामधील एका गीतामध्ये असे वर्णन करण्यात आलेले आहे की साक्षात ब्रह्मदेव ही भगवान श्रीकृष्णाचे भक्त झाले होते. कथेनुसार भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसमवेत गाई चारत होते. त्यांचे मित्र श्रीकृष्णाच्या गुणांचे वर्णन करत नाचत गात होते. ब्रह्मदेवाने विचार केला की गोप गणांचे प्रेम हे दिखावा आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाने गोपी गण आणि सर्व गाईंना अदृष्य केले. मात्र श्रीकृष्णाने आपल्या मित्रांना, गोपागणांना, व गाईंना पुन्हा जन्म दिला जे त्यांना ही लक्षात आले नाही. हे पाहून ब्रह्मदेवाला आपल्या चुकीची जाणीव झाली व त्यांनी श्रीकृष्णाची माफी मागितली. तेव्हापासून ब्रह्मदेव श्रीकृष्णाचे भक्त झाले असे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या वेशभूषेमध्ये एक लाल लुंगी याच्या किनाऱ्यावर पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. गडद निळ्या रंगाचा कुर्ता डोक्यावर ‘मोडी’ जी मोरपंखांनी सजवलेली असते व कलशाच्या आकाराची लाकडी मुकुट असतो.चेहऱ्यावर ‘चूट्टी’ असते जी एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत बांधलेली पांढरी पट्टी असते. ही पट्टी पाणी, लिंबू रस आणि तांदळाच्या पिठापासून तयार केली जाते.मिश्रणावर विशेष लक्ष देत कलाकारांच्या चेहऱ्यावर नीलम, मनयोलाचा आणि बारीक कोळसा यांचाही वापर केला जातो. परंपरेनुसार श्रीकृष्णाचा चेहरा हिरव्या रंगाचा असतो. श्रीकृष्णाच्या वाढत्या वयानुसार साहस आणि शौर्याचे प्रतिक म्हणून चेहऱ्यावरील रंग अधिक गडद केला जातो. कृष्ण कवचाच्या वर विविधरंगी मोत्यांच्या माळा कमरपट्टा आणि हातांमध्ये विविध चमकणारे आभूषण ज्यामध्ये पहुंची, बांगड्या, कानात कुंडल, कपाळावर विविधरंगी तिलक लावले जातात. कृष्णाट्टमच्या विविध पात्रांमध्ये ब्रह्मा, यमराज, पूतना, मुरा, नरकासुर, जांबावन, या विविध पात्रांसाठी विविध प्रकारचे मुखवटे तयार करून वापरले जातात. सामुथी मानवेदन राजा (१५८५ ते १६५८) यांचे अनायनाथ कृष्ण पिशरोडी व देसमंगलाथ व्हेरियरकडून शिक्षण झाले.त्यांनी १६४३ मध्ये पूर्णाभार चंपू (संस्कृत) लिहिले. त्यांनी १६ नोव्हेंबर १६५३ रोजी कृष्णाट्टम केले. गुरुवायूर येथील 'पंज्यानाम' गेस्ट हाऊसजवळ त्यांचा पुतळा बसविण्यात आला. कृष्णाट्टमची सुरुवात या श्लोकाने होते. “जगती सुकृतिलोकायः नंदीथांतिथिदास कलाविरनिथावमसिभासमानसमाना | पशुयुवाथीभोग्य देवथादेवता सा सजलाजलाधापालिमेचका मी चाकस्थु” अशा श्लोक व्यतिरिक्त हे जयदेवच्या ‘गीत गोविंद’ यांच्यासारख्या अनेक पद्यगीथमांनी सुशोभित केले आहे. ‘कृष्णागिती’ हे एक उत्कृष्ट नमुना आहे. कृष्णाट्टमची विविध प्रकार येथे सूचीबद्ध आहेत. १.मुलाच्या जन्मासाठी ‘अवतारम’. २.‘कालियामर्धनम्’ विषाचा प्रभाव दूर करण्यासाठी. ३.जोडप्यांमधील वाद मिटविण्यासाठी ‘रासक्रीडा’. ४.’कामसंवादम’ शत्रूंना दूर करण्यासाठी. ५.’स्वयंवर’ विवाह शुभेच्छा. ६.चांगल्या शेतीच्या उत्पादनासाठी गरिबी दूर करण्यासाठी ‘बाणायुद्ध’. ७.दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि शेतातून उत्पन्न वाढविण्यासाठी ‘विविधवधम’. ८.दिवंगत आत्म्यास शांती मिळावी यासाठी ‘स्वर्गारोहनम्’. कलाकारांना प्रशिक्षण 'वेषम' आणि संगीतासाठी १० व्या वर्षापासून, मद्दलम आणि चुट्टीसाठी ५ व्या वर्षे सुरू होते. उत्तरेकडील ‘गुरुवायूर’ मंदिरात भगवान गुरुवायूरप्पन यांना रात्रीचे प्रदर्शन भक्तांनी अर्पण केल्यावर याची सुरुवात होते. संपूर्ण भारतामध्ये साकारण्याव्यतिरिक्त, याचे युरोप , यू.एस.ए., सिंगापूर, पॅरिस मध्ये सादरीकरण झाले आहे.