Accessibility options
Accessibility options
Government of India
Contributor : Pravin punde14/07/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
एखाद्या रेषेने तीवरील एका बिंदूभोवती, एकाच प्रतलात (पातळीत) केलेल्या परिभ्रमणाचे मोजमाप म्हणजे कोन होय. जेव्हा दोन रेषा परस्परांत छेदतात तेव्हा त्यांतील कोणतीही एक रेषा छेदबिंदू भोवतीच्या ज्या परिभ्रमणाने दुसरीच्या स्थानी आणता येईल, त्या परिभ्रमणास त्या दोन रेषांमधील कोन म्हणतात. उदा., आकृतीत दाखविल्याप्रमाणेकखआणिकगया दोन रेषाकमध्ये छेदतात. बाणाने दाखविल्याप्रमाणे प्रतिघटीवत(घड्याळातील काट्यांच्या गतीच्या विरुध्द) दिशेने कख ही रेषा क भोवती फिरवून कग रेषेशी जुळती करता येईल. अशा परिभ्रमणास कोन खकग म्हणतात आणि तो ∠ खकग असा दर्शवितात. कख आणि कग यांना कोन भुजा म्हणतात. वरील उदाहरणाप्रमाणे परिभ्रमण प्रतिघटीवत असेल, तर कोन धन मानतात आणि परिभ्रमण घटीवत असेल, तर झालेला कोन ऋण मानण्याची प्रथा आहे.
वरील उदाहरणात जरकखनेकभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण कोली तर ती मूळस्थानी परत येईल. या परिभ्रमणात जो कोन होईल त्याचे ३६० सारखे भाग केले असता त्यांतील प्रत्येकास अंश म्हणतात. म्हणजेच एक पूर्ण प्रदक्षिणा= ३६० अंश. एका अंशाचे ६० सारखे भाग केले असता त्या प्रत्येकास कला (मिनिट) व प्रत्येक कलेचे ६० सारखे भाग केले असता त्या प्रत्येकास विकला (सेकंद) म्हणतात. अंश, कला आणि विकला दर्शविण्यासाठी त्या त्या आकड्यांच्या डोक्यावर अनुक्रमे ०, ', '', या चिन्हांचा उपयोग करतात. एका पूर्ण प्रदक्षिणेचे चार सारखे भाग केले, तर त्यांतील प्रत्येकास काटकोन म्हणतात. अर्थातच एक काटकोन = ९०० . जेव्हा दोन रेषांमधील कोन काटकोन असतो तेव्हा त्या परस्परांस लंब आहेत असे म्हणतात. ९०० पेक्षा कमी असलेल्या कोनास लघुकोन, ९०० पेक्षा जास्त व १८०० पेक्षा कमी असल्यास विशालकोन, १८०० ला सरळकोन आणि १८०० पेक्षा जास्त असल्यास प्रविशालकोन अशी नावे दिलेली आहेत. वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, कोन कितीही अंशाचा वा कोणत्याही चिन्हाचा असू शकतो. उदा ७८०० कोन म्हणजे (परिभ्रमण करणाऱ्या) रेषेने दोन प्रदक्षिणा पूर्ण करून आणखी ६०० चे परिभ्रमण केले कारण ७८०० = २ × ३६००+ ६००. तसेच -४३०० म्हणजे घटीवत दिशेने एक पूर्ण प्रदक्षिणा आणि ७०० होत.
कोन मोजण्याच्या आणखी एका पद्धतीत एका काटकोनाचे १०० अंश (डिग्री), प्रत्येक अंशाची १०० मिनिटे (किंवा ग्रेड) व प्रत्येक मिनिटाचे १०० सेकंद अशी विभागणी करतात. या पध्दतीस शतमान पध्दती म्हणतात. ही फारशी वापरात नाही.
सैध्दांतिक विवरणात अरीयमान (रेडियन) नावाची कोन मोजण्याची पद्धती रूढ आहे. दोन रेषांचा छेदबिंदू मध्य कल्पून एकक त्रिज्येचे वर्तुळ काढले असता त्या वर्तुळाच्या परिघाचा जो भाग त्या दोन रेषांमध्ये समाविष्ट होतो त्याची लांबी म्हणजेच त्या दोन रेषांमधील कोनाचे अरीयमान होय. ज्यावेळी ही लांबी एककाइतकीच असेल त्यावेळी होणारा कोन एक अरीय असतो. एकक त्रिज्येच्या वर्तुळाचा परिघ २ इतक्या लांबीचा असल्याने एक संपूर्ण प्रदक्षिणा म्हणजे २ अरीये होय. म्हणजेच १ काटकोन = ९०० = π/२ अरीये असे लिहिता येईल. यावरून दोन्ही पध्दतींतील कोनांच्या मूल्याचे परस्पर रूपांतर करता येते.
ज्यावेळी दोन रेषा एकमेकींस छेदत नाहीत (म्हजेच त्या वितलीय असतील) तेव्हा त्यांतील कोनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात. कोणताही एक बिंदू घेऊन त्यातून दिलेल्या दोन्ही रेषांना समांतर रेषा काढल्या असता त्यांमध्ये होणारा कोन म्हणजेच दिलेल्या वितलीय रेषांमधील कोन होय.
जेव्हा दोन प्रतले परस्परांस एका रेषेत छेदतात तेव्हा त्यांमधील द्वितल कोनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात. समजा, क आणि ख ही दोन प्रतलेयरया रेषेत परस्परांस छेदतात. ब हा यर वरील कोणताही बिंदू घेतला आणि ब मधून बप ही क प्रतलावर यर ला लंब अशी रेषा काढली व तशीच बफ ही यर ला काटकोन करणारी रेषा ख प्रतलावर काढली, तर ∠ पबफ हा क आणि ख या दोन प्रतलांतील कोन होय.
जेव्हा तीन प्रतले एका बिंदूतून जातात तेव्हा त्यांच्या योगे त्रितल कोन तयार होतो. त्याच प्रमाणे एकाच बिंदूतून जाणाऱ्या अनेक प्रतलांयोगे बहुतल कोन तयार होतो. बहुतल कोन मोजण्याची पद्धती ही अरीयमान पध्दतीचे व्यापक स्वरूप आहे. ती अशी : कोन तयार करणाऱ्या प्रतलांचा छेदबिंदू हा मध्य कल्पून जर एकक त्रिज्येचा गोल काढला, तर त्या गोल पृष्ठाचा जो भाग त्या प्रतलांमध्ये समाविष्ट होतो, त्याचे क्षेत्रफळ म्हणजे त्या बहुतल कोनाचे मान होय. एकक त्रिज्येच्या गोलाचे एकूण पृष्ठफळ ४Π इतकेच असल्याने जास्तीत जास्त एवढाच बहुतल कोन शक्य आहे, हे उघड आहे.
ब हा कोणताही बिंदू आणि कोणताही एक आवृत्त (बंद) वक्र घेतला व त्यावरील प्रत्येक बिंदूतून ब शी जोडणाऱ्या रेषा काढल्या तर या सर्व रेषांनी बध्द असा ब बिंदूशी घन कोन तयार होतो. यामध्ये आवृत वक्र जर बहुभुज असेल तर बहुतल कोन मिळेल. घन कोन मोजण्याची पध्दती बहुतल कोन मोजण्याच्या पध्दतीप्रमाणेच आहे, कोनबिंदू मध्य कल्पून एकक त्रिज्येचा गोल घेतला, तर घन कोन तयार करणाऱ्या रेषांमध्ये असलेल्या गोल पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजेच घन कोनाचे मान होय.
वक्रांमधील कोनदोन वक्र जर परस्परांस छेदत असतील, तर त्यांच्या छेदबिंदूशी त्या दोन्ही वक्रांना स्पर्शिका (स्पर्शरेषा) काढल्यास त्या स्पर्शिकांमधील कोन म्हणजेच त्या दोन वक्रांमधील कोन होय.
दोन पृष्ठांच्या समाईक बिंदूशी जर दोन्ही पृष्ठांना प्रलंब (स्पर्श करणाऱ्या प्रतलाला काढलेली लंबरेषा) काढले, तर त्या प्रलंबामध्ये असलेला कोन म्हणजेच त्या पृष्ठांमधील कोन होय.
एखाद्या रेषेने तीवरील एका बिंदूभोवती, एकाच प्रतलात (पातळीत) केलेल्या परिभ्रमणाचे मोजमाप म्हणजे कोन होय. जेव्हा दोन रेषा परस्परांत छेदतात तेव्हा त्यांतील कोणतीही एक रेषा छेदबिंदू भोवतीच्या ज्या परिभ्रमणाने दुसरीच्या स्थानी आणता येईल, त्या परिभ्रमणास त्या दोन रेषांमधील कोन म्हणतात. उदा., आकृतीत दाखविल्याप्रमाणेकखआणिकगया दोन रेषाकमध्ये छेदतात. बाणाने दाखविल्याप्रमाणे प्रतिघटीवत(घड्याळातील काट्यांच्या गतीच्या विरुध्द) दिशेने कख ही रेषा क भोवती फिरवून कग रेषेशी जुळती करता येईल. अशा परिभ्रमणास कोन खकग म्हणतात आणि तो ∠ खकग असा दर्शवितात. कख आणि कग यांना कोन भुजा म्हणतात. वरील उदाहरणाप्रमाणे परिभ्रमण प्रतिघटीवत असेल, तर कोन धन मानतात आणि परिभ्रमण घटीवत असेल, तर झालेला कोन ऋण मानण्याची प्रथा आहे.कोनाची व्याख्याकोनाची व्याख्या
वरील उदाहरणात जरकखनेकभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण कोली तर ती मूळस्थानी परत येईल. या परिभ्रमणात जो कोन होईल त्याचे ३६० सारखे भाग केले असता त्यांतील प्रत्येकास अंश म्हणतात. म्हणजेच एक पूर्ण प्रदक्षिणा= ३६० अंश. एका अंशाचे ६० सारखे भाग केले असता त्या प्रत्येकास कला (मिनिट) व प्रत्येक कलेचे ६० सारखे भाग केले असता त्या प्रत्येकास विकला (सेकंद) म्हणतात. अंश, कला आणि विकला दर्शविण्यासाठी त्या त्या आकड्यांच्या डोक्यावर अनुक्रमे ०, ', '', या चिन्हांचा उपयोग करतात. एका पूर्ण प्रदक्षिणेचे चार सारखे भाग केले, तर त्यांतील प्रत्येकास काटकोन म्हणतात. अर्थातच एक काटकोन = ९०० . जेव्हा दोन रेषांमधील कोन काटकोन असतो तेव्हा त्या परस्परांस लंब आहेत असे म्हणतात. ९०० पेक्षा कमी असलेल्या कोनास लघुकोन, ९०० पेक्षा जास्त व १८०० पेक्षा कमी असल्यास विशालकोन, १८०० ला सरळकोन आणि १८०० पेक्षा जास्त असल्यास प्रविशालकोन अशी नावे दिलेली आहेत. वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, कोन कितीही अंशाचा वा कोणत्याही चिन्हाचा असू शकतो. उदा ७८०० कोन म्हणजे (परिभ्रमण करणाऱ्या) रेषेने दोन प्रदक्षिणा पूर्ण करून आणखी ६०० चे परिभ्रमण केले कारण ७८०० = २ × ३६००+ ६००. तसेच -४३०० म्हणजे घटीवत दिशेने एक पूर्ण प्रदक्षिणा आणि ७०० होत. कोन मोजण्याच्या आणखी एका पद्धतीत एका काटकोनाचे १०० अंश (डिग्री), प्रत्येक अंशाची १०० मिनिटे (किंवा ग्रेड) व प्रत्येक मिनिटाचे १०० सेकंद अशी विभागणी करतात. या पध्दतीस शतमान पध्दती म्हणतात. ही फारशी वापरात नाही. सैध्दांतिक विवरणात अरीयमान (रेडियन) नावाची कोन मोजण्याची पद्धती रूढ आहे. दोन रेषांचा छेदबिंदू मध्य कल्पून एकक त्रिज्येचे वर्तुळ काढले असता त्या वर्तुळाच्या परिघाचा जो भाग त्या दोन रेषांमध्ये समाविष्ट होतो त्याची लांबी म्हणजेच त्या दोन रेषांमधील कोनाचे अरीयमान होय. ज्यावेळी ही लांबी एककाइतकीच असेल त्यावेळी होणारा कोन एक अरीय असतो. एकक त्रिज्येच्या वर्तुळाचा परिघ २ π इतक्या लांबीचा असल्याने एक संपूर्ण प्रदक्षिणा म्हणजे २ πअरीये होय. म्हणजेच १ काटकोन = ९०० = π/२ अरीये असे लिहिता येईल. यावरून दोन्ही पध्दतींतील कोनांच्या मूल्याचे परस्पर रूपांतर करता येते. ज्यावेळी दोन रेषा एकमेकींस छेदत नाहीत (म्हजेच त्या वितलीय असतील) तेव्हा त्यांतील कोनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात. कोणताही एक बिंदू घेऊन त्यातून दिलेल्या दोन्ही रेषांना समांतर रेषा काढल्या असता त्यांमध्ये होणारा कोन म्हणजेच दिलेल्या वितलीय रेषांमधील कोन होय. द्वितल कोन : जेव्हा दोन प्रतले परस्परांस एका रेषेत छेदतात तेव्हा त्यांमधील द्वितल कोनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात. समजा, क आणि ख ही दोन प्रतलेयरया रेषेत परस्परांस छेदतात. ब हा यर वरील कोणताही बिंदू घेतला आणि ब मधून बप ही क प्रतलावर यर ला लंब अशी रेषा काढली व तशीच बफ ही यर ला काटकोन करणारी रेषा ख प्रतलावर काढली, तर ∠ पबफ हा क आणि ख या दोन प्रतलांतील कोन होय. त्रितल कोन व बहुतल कोन : जेव्हा तीन प्रतले एका बिंदूतून जातात तेव्हा त्यांच्या योगे त्रितल कोन तयार होतो. त्याच प्रमाणे एकाच बिंदूतून जाणाऱ्या अनेक प्रतलांयोगे बहुतल कोन तयार होतो. बहुतल कोन मोजण्याची पद्धती ही अरीयमान पध्दतीचे व्यापक स्वरूप आहे. ती अशी : कोन तयार करणाऱ्या प्रतलांचा छेदबिंदू हा मध्य कल्पून जर एकक त्रिज्येचा गोल काढला, तर त्या गोल पृष्ठाचा जो भाग त्या प्रतलांमध्ये समाविष्ट होतो, त्याचे क्षेत्रफळ म्हणजे त्या बहुतल कोनाचे मान होय. एकक त्रिज्येच्या गोलाचे एकूण पृष्ठफळ ४Π इतकेच असल्याने जास्तीत जास्त एवढाच बहुतल कोन शक्य आहे, हे उघड आहे. घन कोन : ब हा कोणताही बिंदू आणि कोणताही एक आवृत्त (बंद) वक्र घेतला व त्यावरील प्रत्येक बिंदूतून ब शी जोडणाऱ्या रेषा काढल्या तर या सर्व रेषांनी बध्द असा ब बिंदूशी घन कोन तयार होतो. यामध्ये आवृत वक्र जर बहुभुज असेल तर बहुतल कोन मिळेल. घन कोन मोजण्याची पध्दती बहुतल कोन मोजण्याच्या पध्दतीप्रमाणेच आहे, कोनबिंदू मध्य कल्पून एकक त्रिज्येचा गोल घेतला, तर घन कोन तयार करणाऱ्या रेषांमध्ये असलेल्या गोल पृष्ठाचे क्षेत्रफळ म्हणजेच घन कोनाचे मान होय. वक्रांमधील कोन : दोन वक्र जर परस्परांस छेदत असतील, तर त्यांच्या छेदबिंदूशी त्या दोन्ही वक्रांना स्पर्शिका (स्पर्शरेषा) काढल्यास त्या स्पर्शिकांमधील कोन म्हणजेच त्या दोन वक्रांमधील कोन होय. पृष्ठांमधील कोन : दोन पृष्ठांच्या समाईक बिंदूशी जर दोन्ही पृष्ठांना प्रलंब (स्पर्श करणाऱ्या प्रतलाला काढलेली लंबरेषा) काढले, तर त्या प्रलंबामध्ये असलेला कोन म्हणजेच त्या पृष्ठांमधील कोन होय.
लेखक : क.म.आगाशे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
सफेद कोह : श्वेत पर्वत. (१) अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील व पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील डोंगररांग. ही अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली असून हिंदुकुश पर्वताचा तो एक फाटा आहे. पर्शियन भाषेतील कोह म्हणजे ‘ पर्वत ’ यावरून हिमाच्छादित शिखरांमुळे तिला हे नाव पडले असावे.
बोन : विद्यमान नाव ॲन्नाब. अल्जीरिया देशाच्या ॲन्नाब प्रांतातील इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर. लेकसंख्या ५,००,००० (१९८० अंदाज) अल्जिअर्स शहराच्या पूर्वेस हे ४२० किमी. व कॉन्स्टंटीनच्या ईशान्येस १५६ किमी. अंतरावर भूमध्य समुद्रास मिळणाऱ्या वेड सेबूझ नदीमुखावर वसलेले आहे.
जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतीच्या सूक्ष्म रूपांसंबंधीच्या त्यांच्या कार्यामुळे लूई पाश्चर आणि रॉबर्ट कॉख यांच्या बरोबरीने सूक्ष्मजीवशास्त्राच्या आद्य प्रवर्तकांत त्यांची गणना होते.
दगडी कोळशाचे काही प्रकार हवेशिवाय तापविल्यास जो बाष्पनशील (उडून जाणारा) भाग निर्माण होतो त्यातून डांबर, अमोनिया इ. वेगळे केल्यावर जो वायू मिळतो त्यास कोल गॅस असे म्हणतात.
कॅन : फ्रान्सच्या आग्नेय भागातील बंदर.लोकसंख्या ६७,१५२ (१९६८).आल्प्स मॅरिटाइम प्रांतातील हे बंदर नीसच्या नैर्ऋत्येस२ ९किमी.असून फ्रेंच रिव्हिएरा मधील हवा खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
कलन याचा मूळ अर्थ जाणणे, समजावून घेणे, आकलन करणे असा आहे. कलन याचा इंग्रजी प्रतिशब्द Calculus हा Calcule (अर्थ : लहान खडे अथवा गोटे) या लॅटिन शब्दावरून आला आहे.
Contributor : Pravin punde14/07/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
31
सफेद कोह : श्वेत पर्वत. (१) अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील व पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील डोंगररांग. ही अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली असून हिंदुकुश पर्वताचा तो एक फाटा आहे. पर्शियन भाषेतील कोह म्हणजे ‘ पर्वत ’ यावरून हिमाच्छादित शिखरांमुळे तिला हे नाव पडले असावे.
बोन : विद्यमान नाव ॲन्नाब. अल्जीरिया देशाच्या ॲन्नाब प्रांतातील इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर. लेकसंख्या ५,००,००० (१९८० अंदाज) अल्जिअर्स शहराच्या पूर्वेस हे ४२० किमी. व कॉन्स्टंटीनच्या ईशान्येस १५६ किमी. अंतरावर भूमध्य समुद्रास मिळणाऱ्या वेड सेबूझ नदीमुखावर वसलेले आहे.
जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतीच्या सूक्ष्म रूपांसंबंधीच्या त्यांच्या कार्यामुळे लूई पाश्चर आणि रॉबर्ट कॉख यांच्या बरोबरीने सूक्ष्मजीवशास्त्राच्या आद्य प्रवर्तकांत त्यांची गणना होते.
दगडी कोळशाचे काही प्रकार हवेशिवाय तापविल्यास जो बाष्पनशील (उडून जाणारा) भाग निर्माण होतो त्यातून डांबर, अमोनिया इ. वेगळे केल्यावर जो वायू मिळतो त्यास कोल गॅस असे म्हणतात.
कॅन : फ्रान्सच्या आग्नेय भागातील बंदर.लोकसंख्या ६७,१५२ (१९६८).आल्प्स मॅरिटाइम प्रांतातील हे बंदर नीसच्या नैर्ऋत्येस२ ९किमी.असून फ्रेंच रिव्हिएरा मधील हवा खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.
कलन याचा मूळ अर्थ जाणणे, समजावून घेणे, आकलन करणे असा आहे. कलन याचा इंग्रजी प्रतिशब्द Calculus हा Calcule (अर्थ : लहान खडे अथवा गोटे) या लॅटिन शब्दावरून आला आहे.