● बऱ्याच पतंगांमध्ये व फुलपाखरांमध्ये अशा ग्रंथी असतात.

● अशा ग्रंथींतून स्रवणाऱ्या पदार्थामुळे मादीस नर आकृष्ट करून घेतो.

● पुष्कळ नर फुलपाखरांच्या विशिष्ट खवल्यांवर (अँड्रोकोनिया) ह्या ग्रंथी असतात. त्यांमधून लैंगिक आकर्षक द्रव्य बाहेर पडते.

● अशा ग्रंथी इतर कीटकांच्या पायावर, पोटावर अगर पोटाच्या इतर शेवटच्या खंडावर असतात. काही पतंगांच्या बाबतीत अशा ग्रंथी मादीच्या शरीरावर असतात व त्यामुळे नरास मादी आकृष्ट करून घेते.

● काही कीटकांच्या अशा ग्रंथीमधून स्रवणाऱ्या पदार्थामुळे स्वतःचे संरक्षण करणे शक्य होते. स्रवणाऱ्या पदार्थास अतिशय दुर्गंधी येत असल्यामुळे त्याचे शत्रू दूर राहतात. उदा., ढेकूण.

● लैंगिक आकर्षणाशिवाय मधमाशी विशिष्ट खुणेचा गंध स्रवते. त्यामुळे पोळ्यातील व्यक्तिगत माशी ओळखता येते व घरट्याची दिशा कळते.

● फॉर्मायका रूफा ही मुंगी आपल्या मार्गाची खूण करण्यासाठी ग्रंथीतून ब्युटिरिक अम्ल स्रवते.

लेखक- वा. रा.गर्दे

स्रोत- मराठी विश्वकोश