Accessibility options
Accessibility options
Government of India
Loading content...
Contributor : 07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
कनिष्काचे साम्राज्य फार विस्तृत प्रदेशावर पसरले होते. उत्तरेस मध्य आशियातील खोतानपासून महाराष्ट्र-विदर्भापर्यंत वपश्चिमेस खोरासानपासून पूर्वेस बिहार-ओरिसा पर्यंतचा विशाल प्रदेश त्याच्या साम्राज्यात अंतर्भूत होता. यांवर त्याने आपले क्षत्रप किंवा प्रांताधिपती नेमले होते. भारताच्या वायव्य प्रांतावरील लल, वेश्पशि, लिअक यांसारखे तसेच उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागावरील खरपल्लान आणि वनस्फर या त्याच्या क्षत्रपांची व सेनापतींची नावे कोरीव लेखांत आली आहेत. या लेखांचे ऐतिहासिक महत्त्व म्हणूनच मोठे आहे.
कनिष्काची नाणी काबूल, कंदाहार, बंगाल, बिहार, ओरिसा, छत्तीसगढ इ. अत्यंत विस्तृत प्रदेशांत सापडली आहेत. त्याच्या साम्राज्यात विविध धर्मांचे अनुयायी रहात असल्यामुळे त्या नाण्यांवर भारतीय शिव आणि शाक्यमुनी बुद्ध,पारशी वात, अग्नी आणि मिहिर (सूर्य), सुमेरियन नना, ग्रीक हेलिओस इ. अनेक देवातांच्या आकृती आढळतात.
कनिष्काची राजधानी पुरुषपुर (पेशावर) येथे होती. तेथे त्याने एक उत्तुंग स्तूप बांधला होता; त्याचा निर्देश चिनी यात्रेकरू फाहियान व ह्युएनत्संग यांनी केला आहे. त्याने पाटलिपुत्राहून (किंवा साकेतहून) सुप्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ अश्वघोष याला आणवून गांधार देशात (काहींच्या मते काश्मीरात) मोठी बौद्ध परिषद भरविली होती. तिचा अध्यक्ष वसुमित्र आणि उपाध्यक्ष अश्वघोष होता. या परिषदेत बौद्ध धर्मग्रंथ जमवून त्यांवर टीका लिहिण्यात आल्या. कनिष्काच्या काळी बौद्ध महायान पंथाचा उदय झाला.
कनिष्काचा अनेक विद्वानांना उदार आश्रय होता. पार्श्व, वसुमित्र, अश्वघोष, नागार्जुन, संघरक्ष इ. बौद्ध तत्त्वज्ञांप्रमाणे आयुर्वेद ग्रंथकार चरक हाही त्याच्या आश्रयास होता, असे म्हणतात.
कनिष्काची कारकीर्द शोकपर्यवसायी झाली. ख्रिस्तोत्तर ७३ ते ९४ या काळात चिनी सेनापती पांचाव याने मध्य आशियात आक्रमण करून खोतान, काशगर इ. पश्चिमेचे प्रदेश जिंकून चिनी सत्ता कॅस्पियन समुद्रापर्यंत पसरविली. आपण चिनी सम्राटाच्या बरोबरीचे आहो, हे दाखविण्याकरिता कनिष्काने चिनी राजकन्येला मागणी घातली. हा आपल्या स्वामीचा अपमान आहे, असेपांचावला वाटून त्याने कनिष्काला युद्धाचे आव्हान दिले. कनिष्काने त्यावर ७०,००० घोडेस्वारांचे सैन्य पामीर पठारावर पाठविले, पणते पर्वतातील दुर्गम प्रदेशांतून जाताना बरेचसे नष्ट झाले. स्वतः कनिष्कही या युद्धात मारला गेला.
विशाल साम्राज्याचा अधिपती, शक संवताचा संस्थापक, बौद्धधर्माचा आश्रयदाता आणि विद्वानांचा पोशिंदा म्हणून कनिष्काचेनाव भारताच्या प्राचीन इतिहासात चिरस्मरणीय राहील.
पहा : कुशाण वंश.
संदर्भ : 1. Majumdar, R. C., Ed. The Age of Imperial Unity, Bombay, 1960.
2. Nilakanth-Sastri, K. A. Comprehensive History of India, Bombay, 1956.
मिराशी, वा. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शासकीय (खुल्या)गुणवत्ता शिष्यवृत्त्या
भारतीय कीर्तीचे व्यंगचित्रकार. लक्ष्मण हे सुप्रसिद्ध इंग्रजी भाषिक कादंबरीकार आर्.के. नारायणयांचे कनिष्ठ बंधू होत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय हे शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ राज्यस्तरीय कार्यालय असून,हे पुणे येथे स्थित आहे.
एक तमिळ महाकवी. शिलप्पधिकारम् या आद्य तमिळ महाकाव्याचा कर्ता.इळंगो हा शेंगुट्टवन या चेर राजाचा कनिष्ठ बंधू.
वरिष्ठ सरकारी शासनाने आपल्या उत्पन्नातून कनिष्ठ शासनाला दिलेली आर्थिक मदत.
अधिराज्यत्व ह्या संज्ञेने मध्ययुगात राजा, वरिष्ठ सरंजामी सरदार व कनिष्ठ सरदार ह्यांच्यामधील संबंध दर्शविले जात.