झुक झुक झुक झुक अगीनगाडीधुरांच्या रेघा हवेत काढीपळती झाडे पाहूयामामाच्या गावाला जाऊयामामाचा गाव मोठासोन्याचांदीच्या पेठाशोभा पाहुन घेऊयामामाची बायको गोरटीम्हणेल कुठली पोरटीभाच्यांची नावे सांगूयामामाची बायको सुगरणरोज रोज पोळी शिकरणगुलाबजामुन खाऊयामामा मोठा तालेवाररेशीम घेईल हजार वारकोट विजारी लेऊया कवी : ग. दि. माडगूळकर