मुलगी थ -थ –थंडी, दे ग आई बंडी ! खाऊ मस्त – मस्त, झोपून राहू सुस्त ! आई थ -थ थंडी, नेसुया ग लुगडी ! खेळू फु- फुगडी, पळून जाईल थंडी ! प -प - पाढे , वाचू ध - ध धडे ! खाऊ खेळू मस्त । नको बनू सुस्त ! मुलगा थ - थ थंडी, दे ग आई बंडी ! खाऊ मस्त मस्त, झोपून राहू सुस्त ! आई थ - थ थंडी, घालू विजार तोकडी ! खेळू ल -ल- लंगडी ! पळून जाईल थंडी ! गिरवू बाराखडी, गाऊ गीते चिमखडी ! करू कसरत थोडी ! उभारू आरोग्याची गुढी ! पळून जाईल थंडी ! पळून जाईल थंडी ! माहिती संकलन: प्राची तुंगार