बर्फाच्या राज्यात किती गमती जमती, चला चला मुलांनो चला संगती ! फर चा कोट चढवू अंगावरती, गम बूट घालू, काठी धरू पुढती ! पांढरा शुभ्र याक, खूप खूप केसाळ, अंगावर त्याच्या बर्फ आहे फेसाळ ! लाल लाल सफरचंद टप टप पडती, पहाडी माणसाच्या गालावर खुलती ! बटाट्यांचा येथे आहे बर सुकाळ, बर्फाच्या अंगणात नाचतात सर्वकाळ! चिकू सारखे दिसते ते 'किवी' फळ, आंबट - गोड गर खाऊन काढूया पळ ! देवदार - चिनार ची हिरवी-हिरवी शाल, बर्फमय बुट्ट्याची किमया विशाल ! हिमनदी आहे जणू दुध- गंगा, डोळे भरून पाहूया करू नका दंगा ! सोनेरी किरणे शिखरावरती, हिम-मोती झेलुया अंगावरती ! बर्फाच्या राज्यात किती गमती जमती, चला मुलांनो चला संगती ! माहिती संकलन: प्राची तुंगार