शाळा सुटली, पाटी फुटलीआई, मला भूक लागलीशाळा सुटता धावत सुटलेठेच लागुनी मी धडपडलेआई मजला नंतर कळलेनवीन कोरी पाटी फुटलीधम्मक लाडू चापट पोळीनको देउ मज हवीच गोळीकिंवा दे ग, खमंग चकलीदे ना लवकर, भूक लागलीसायंकाळी जाउ दे मलापटांगणावर खेळायालातिथे सोबती वाट पाहतीदे ना खाऊ, भूक लागली कवी : योगेश्वर अभ्यंकर