सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदाआठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपरपोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ? कवी : मंगेश पाडगावकर