प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण प्रश्नोत्तरे प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय). प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण २. त्याची आवश्यकता काय आहे शासनाचे धोरणानुसार प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते १)क्र.पीआरई/७०६७/एफ दिनांक १८/०६/१९६८ २)क्र.पीआरई/७०८१/१५५५४७/(१२११)जीईएन-५ दिनांक २५/०३/१९८१ ३)क्र.एफईडी १०९६/२१८६/९६(२७०/९८)माशि-८ दिनांक ३ फेब्रुवारी १९९९ ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा संबंधित शाळा /महाविद्यालया मार्फत जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेवर ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन