पायाभूत सुविधा - परिचय
पायाभूत सुविधा (नागरी कामे) हा सर्व शिक्षा अभियान योजनेचा महत्वपूर्ण भाग असून एकूण वार्षिक अर्थसंकल्पातील ३३% हिस्सा त्यावरच खर्च केला जातो. मुलांना शाळेपर्यंत आणणे, या सर्व शिक्षा अभियानाच्या एका महत्वपूर्ण हेतूच्या पूर्ततेच्या दृष्टीने शालेय पायाभूत सुविधांची तरतूद सहाय्यक ठरते. मुले शाळेत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनेही पायाभूत सुविधा महत्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांचा अध्ययन दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने चांगल्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा उत्प्रेरक ठरतात.
पायाभूत सुविधांतर्गत पुढील महत्वाची कामे पार पाडली जातात

(नागरी कामे) बांधकामे

नवीन प्राथमिक शाळा

आवश्यकतेनुसार अतिरिक्त वर्गखोल्या

समूह/गट/नागरी स्रोत केंद्र

मुले/मुली /वि.ग.अ. बालकांसाठी प्रसाधनगृह

पाण्याची सोय

वीज जोडणी

कुंपण भिंत

उतरण

स्वयंपाकाचा आडोसा

दुरुस्तीची कामे

किरकोळ दुरुस्ती

मोठी दुरुस्ती

जिल्हावार अर्थसंकल्पीय तरतूद आणि कामाच्या वार्षिक आराखड्याची तयारी

प्रगतीसंदर्भातील देखरेख आणि निधी संवितरणासंदर्भात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्हा अधिका-यांसह समन्वय

जमा माहितीचे विश्लेषण

DISE अर्थात डिस्ट्रीक्ट्र इन्फर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन

च्या वार्षिक सर्वेक्षणानुसार विभाग वरील माहिती जमा करतो. खालील माहिती DISE मधून प्राप्त होते.

प्रसाधनगृह

पाण्याची सुविधा

कुंपणाची भिंत

वीज

उतरण

वर्गखोलीचे तपशील

सर्वेक्षणाचे अर्ज शाळांमध्ये हाताने भरले जातात. जिल्हा कार्यालयात त्यांचे डीजीटायझेशन केले जाते आणि राज्य स्तरावर त्यांचे संकलन केले जाते. त्यानंतर MHRD व्दारा ते ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातात.DISE मार्फत वर्षातून एकदाच सर्वेक्षण करत असल्यामुळे पायाभूत सुविधांसंदर्भातील विविध पैलुंबाबत अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी विभागामार्फत अतिरिक्त सर्वेक्षण करून माहिती जमवली जाते.

पायाभूत सुविधासंदर्भातील अर्थसंकल्प (नागरी कामे)

खालील तक्त्यावरून मागील 3 वर्षांतील पायाभूत सविधांविषयक अर्थसंकल्पीय तरतुदीचे चित्र स्पष्ट होते. केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्रात शिक्षण, हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणी नंतर प्राप्त अतिरिक्त निधीनंतरही 2010-11 वर्षापासून या तरतुदीत वाढ झाल्याचे लक्षात होते.

स्त्रोत : महाराष्ट्र शासन