आहाराचे घटक किंवा मूलतत्त्वे उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. (मुख्यत: पिठूळ पदार्थ) शरीराच्या घडणीसाठी लागणारे पदार्थ: प्रथिने. चयापचयासाठी व प्रतिकारशक्तीसाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असणारी विविध जीवनसत्त्वे क्षार : लोह, चुना, इत्यादी खनिज पदार्थ पाणी (रोजची गरज एक ते दीड लिटर) मलविसर्जनासाठी व पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारा चोथा. प्रथिने : नत्रयुक्त पदार्थ शरीरात प्रत्येक भाग हा प्रथिने आणि क्षार यांचा मिळून तयार झालेला असतो. घर जसे विटा, चुना, पत्रे यांचे तयार झालेले असते तसे शरीरही (घनभाग) 75% प्रथिने व क्षारांचे बनलेले असते. प्रथिने हा नत्रयुक्त पदार्थ आहे. पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवातच प्रथिनांपासून झाली. प्रथिने म्हणजे जीवसृष्टीचा अगदी मूळघटक आहे. शिवाय शरीरात60% वजन पाण्याचेच असते. लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine) संदर्भ : आरोग्यविद्या