गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा १९९४, सुधारित २००२

कायद्यातील तरतुदी

पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी याची तपासणी करण्यास बंदी.

पोटातील गर्भाचे लिंग माहित करून गर्भपात करण्यास बंदी

पोटातील गर्भाचे लिंग माहित करून मिळेल अशा स्वरुपाची जाहिरात करण्यास बंदी.

कायद्यातील तरतुदी न पाळल्यास शिक्षा.

प्रसुतीपूर्व लिंग निदान करण्यास कायद्याने बंदी आहे.

कायदा सांगतो की

जिथे सोनोग्राफी केली जाते ती जागा

सोनोग्राफी करण्याचे मशीन, आणि

ते मशीन वापरणारी व्यक्ती

या सर्वांची नोंदणी केली पाहिजे. तसेच संबंधित व्यक्ती प्रशिक्षित आणि पात्र हव्यात.

कायदा सांगतो की

वेटींग रूम, ओपीडी, सोनोग्राफी मशिनच्या शेजारी, येथे गर्भलिंगतपासणी केली जात नाही असा बोर्ड असायला हवा.

डॉक्टरांकडे या कायद्याची प्रत असायला हवी.

सोनोग्राफी मशीन वापरण्यासंबंधीचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध असावे.

सोनोग्राफी मशीन, केंद्राची जागा यांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावलेले असावे.
स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट