अल्सर म्हणजे काय

पचनमार्गाच्या आवरणावर होणा-या जखमा म्हणजे अल्सर. अल्सर सामान्यपणे डिओडिनममध्ये (आतड्याच्या पहिल्या भागात) होतो किंवा पोटात होतो. (त्याला गॅस्ट्रीक अल्सर असे म्हणतात).

अल्सर कशाने होतो

हेलिकोबॅक्टर पायरोली नावाच्या जिवाणू मुळे बरेचसे अल्सर होतात.

आम्ल व इतर पाचक द्रव्ये पचनमार्गावर जळजळ करुन अल्सर होण्यास मदत करतात. जेव्हा शरिर जास्त आम्ल तयार करते तेव्हा किंवा पचनमार्गावर जखमा झाल्यास अल्सर होतो.

अल्सर असणा-यांमध्ये तो शाररिक किंवा मानसिक त्रासाने वाढू शकतो.

काही वेदनाशामक गोळ्यांच्या सतत सेवनाने देखील अल्सर होऊ शकतो.

अल्सरची लक्षणे

खाल्यावर चांगले वाटते पण २ ते ३ तासात अचानक तब्येत बिघडते (आतड्याचा अल्सर)

खाल्यावर किंवा काही प्यायल्यावर मचुळ वाटते. (गॅस्ट्रीक अल्सर)

रात्री जाग आणणारी पोट दुखी.

पोटात जड वाटणे, आंबट ढेकर येणे, जळजळ किंवा पोट बिघडणे

उलट्या

अचानक वजनात घट

अल्सरवरील काही सामान्य ऊपाय

धुम्रपान टाळा

डॉक्टरने सांगितल्याशिवाय मनाने औषधे घेणे टाळा.

कॅफेनचे सेवन किंवा दारु पिणे टाळा

छातीत जळजळ असेल तर तिखट खाणे टाळा

अल्सर धोकादायक असल्याची काही चिन्हे

उलटीवाटे रक्त जाणे

उलटीवाटे फार पहिले सेवन केलेले अन्न वा पेय बाहेर पडणे.

अशक्तपणा किंवा मळमळ जाणवणे.

शौचास रक्त जाणे (रक्तामुळे शौचाचा रंग लाल किंवा काळा होतो)

मळमळ होत राहणे किंवा सतत उलट्या होणे.

पोटात अचानक जोरात दुखणे.

वजनात घट होणे

औषध घेऊन देखील दुखणे न थांबणे.

दुखणे पाठी पर्यंत पोहोचणे.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम