मानवाचे हृदय कसे आहे

मानवाचे हृदय हा एक पोकळ, मांसपेशीयूक्त अवयव असून त्याचा आकार बंद मुठीइतका असतो.

आपलं हृदय हे छातीच्या पिंजर्याच्या मध्यभागी किंचित डाव्या बाजूला असते.

हृदयाचे कार्य कसे चालते ?

हे रोज जवळजवळ १ लाख वेळा आणि मिनटाला ६०-९० वेळा धडकते.

प्रत्येक ठोक्याबरोबर शरीरात रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करते.

हृदयाला शुध्द रक्तपुरवठा करणाऱ्या हृदयधमन्या ह्याच हृदयाला प्राणवायू आणि अन्न पुरवतात

हृदय हे डावा व उजवा अशा दोन भागात विभागलेले असते. हृदयाला दोन कप्पे असतात (ज्याला एट्रीयम आणि वेंट्रीकल म्हणतात) जे हृदयाच्या उजव्या व डाव्या बाजूस असतात. हृदयाला एकूण ४ कप्पे असतात.

हृदयाच्या उजव्या कप्प्यात अशुद्ध रक्त आत येते आणि ते फुफ्फूसात पंप केले जाते.

फुफ्फूसात रक्त शुद्ध होते आणि परत हृदयाच्या डाव्या कप्प्यात सोडले जाते. जेथून रक्त शरिराला पोहोचवले जाते.

हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात: २ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक) आणि २ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम्