एखादा माणुस गुदमरत असेल तर तो खोकत असे पर्यंत त्याला थांबवु नका. जर खोकुन अडकलेली वस्तु बाहेर फेकली गेली नाही, आणि रुग्णाला श्वासोश्वासास त्रास होवु लागला तर, किंवा तो काळा निळा पडु लागला व बोलुन सांगु शकत नसला, पटकन त्याला विचारा "तुमच्या घशात काही अडकले आहे कां ?" गुदमरणारा माणुस डोके हलवुन हो म्हणु शकतो पण बोलु शकत नाही. हा प्रश्न व्चरणे गरजेचे आहे कारण हदय विकाराची लक्षणे देखील गुदमरण्यासारखीच असतात, पण त्यात रुग्ण बोलु शकतो.

प्रथमोपचार

छातीवर दाब देणे फक्त काही अतिदक्षता असेल तेव्हाच वापरा

त्याच्या मागे ऊभे राहुन तुमचे हात त्याच्या छातीच्या बाजुने पुढे आणा.

हात एकात एक गुंतवा, व अंगठ्याच्या भागाकडुन रुग्णाच्या घशाच्या खाली व छातीच्या जरा वर दाबा.

तुमचा जोर जरा वाढवा व तुमचे हात बाहेरच्या बाजुला ओढा व वरच्या जबड्यावर आत बाहेर असा भार द्या.

ही पद्धत तो पर्यंत वापरा जो पर्यंत रुग्ण बेशुद्ध होत नाही वा जोरात अडकलेली वस्तु बाहेर पडत नाही.

टीप

या संकटाला तुम्ही तोंड देऊ शकत नाही असे वाटले तर रुग्णाला त्वरीत डाँक्टर कडे न्या.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम