शेती व्यवसायातील अनेक कामांमध्ये अपघातांची शक्यता असते. चांगली काळजी घेता आली तर त्यातले काही अपघात टळू शकतील. उरलेले काही अपघात टाळण्यासाठी मात्र जास्त व्यापक उपाययोजना लागेल.

अपघातांचे वर्गीकरण

यंत्रामुळे होणा-या जखमा :कापणी यंत्रे, डिझेल इंजिने, ट्रॅक्टर यांच्या वापरातील अपघात,

विद्युत धक्का.

जनावरांमुळे होणा-या जखमा : विशेषतः शिंगाने होणा-या जखमा. साप, विंचू,इत्यादींचे विषारी दंश.

विषारी किटकनाशकांमुळे होणारे विषबाधेचे अनेक प्रकार.

विहीर खोदाईसंबंधी अपघात.

या यादीतल्या सगळयाच अपघातांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण काही मुद्दे खालीलप्रमाणे:
सदोष यंत्रे
सदोष यंत्रे हा एक मोठा प्रश्न आहे. कापणीयंत्राच्या बाबतीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. गहू कापणी कामगारांत हे अपघात विशेष प्रमाणात आढळतात. हात, बोटे तुटणे हा एक फारच गंभीर अपघात आहे.
साप, विंचू दंश
साप, विंचू, इत्यादी विषारी प्राण्यांच्या दंशाचे प्रमाण खूप आहे. आपल्या समाजात बूट, हातमोजे वापरण्याची पध्दत नाही. बूट, हातमोजे घातल्यास यातले निम्म्याहून अधिक अपघात सहज टळतील. हे बहुतेक अपघात संध्याकाळी, पहाटे या वेळेत होतात;म्हणून चांगली बॅटरी पाहिजे. योग्य उपचार ताबडतोब मिळाले तर यातले 90% मृत्यू टळू शकतात. विंचू व सर्पदंशाबद्दलचा तपशील वेगळा दिला आहे.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या