सोलर पॅनल्स १.२७ मेगावॅट क्षमतेचे सोलर पॅनल्स १७,५०,००० युनिट्स उर्जा तयार करतात. याचा हिशोब केला तर लक्षात येईल कि, एका गावातील एका घराचा विज वापर दर महिन्याला ६० युनिट्स इतका असतो. म्हणजे एका वर्षाला ७२० युनिट्स इतकी उर्जा एका घराला लागते. या गणितानुसार, एका गावातील २४३० घरांना वर्षभर मिळेल इतकी विज सुला विनयार्ड्स मध्ये तयार होते. आणि ही विज संपूर्ण उद्योगाला लागणाऱ्या विजेचा ५०% वाटा उचलते. याचा विचार करता, १७,५०,००० युनिट्स सौरऊर्जा हि ११७८ मॅट्रिकटन कार्बनडाय आँक्साईड वातावरणात जाण्यापासून वाचवते. छपरांवर सोलर पॅनल्स बसवण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे, या पॅनल्स मुळे वास्तूची छपरे तापत नाहीत. कारण सूर्याची सर्व उष्णता हि पॅनल्समध्ये शोषली जाते आणि छपरे थंड राहतात. त्यामुळे बिल्डिंगस् थंड राहतात, आणि पंखे किंवा एसी करता वापरावी लागणार्या उर्जेचे प्रमाण कमी होते. पाणी तापवण्याकरता सौर उर्जेचा वापर: वाईनरी, रिसॉर्ट आणि इतर उपक्रमांना लागणारे गरम पाणी – क्षमता- २१००० लिटर. या उपक्रमामुळे बॉयलरला लागणारे २३००० लिटर डीझेल वाचते. म्हणजे पुन्हा वातावरणात सोडल्या जाणार्या ३३ मॅट्रिकटन कार्बनडाय आँक्साईडचे उत्सर्जन टाळले जाते. स्काय लाईटस् सुलाने आपल्या वाईनरी आणि कार्यालयांमध्ये १५१ स्काय लाईटस् बसवले आहेत, ज्यामुळे विजेची ३८६१२ युनिट्स वाचतात. हा आकडा देखील प्रकाशासाठी लागणाऱ्या एकूण उर्जेच्या ५०% आहे. रूफ टॉप सोलर पॅनल आणि सोलर लाईट स्रोत : सुला विनयार्डस सीएसआर