बगॅस म्हणजे उसाच्या चिपाडावर आधारित सहवीजनिर्मिती तंत्रज्ञान साध्या भाषेत सांगाचये तर कोजनरेशन उर्फ सहवीजनिर्मिती म्हणजे एकाच इंधनापासून, क्रमाक्रमाने, एकापेक्षा जास्त रूपांत ऊर्जानिर्मिती करणे. वाफ आणि वीज ह्यांच्या सहवीजनिर्मितीमुळे उद्योगांत वापरल्या होणार्या इंधनवापराची एकंदर कार्यक्षमता खूपच वाढते.अर्थात ह्यासाठी ऊष्णता आणि विजेची एकाच वेळी जरूर असणे फार महत्वाचे आहे आणि ही पूर्वअट साखर-उद्योगात पूर्ण होते. वीजनिर्मितीमध्ये ऊष्णता साधारणतः मोठ्या प्रमाणात एखाद्या कमी तापमानावरील हीट सिंकमध्ये सोडली जाते. वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ही ऊष्णता शोषण्याचे काम कंडन्सर्स करतात आणि आशाप्रकारे वापेतली जवळजवळ ७० टक्के ऊष्णता हवेत सोडून दिली जाते. परंतु कोजनरेशन पद्धतीत ह्या ऊष्णतेचा उपयोग विविध प्रक्रियांसाठी करून घेता येतो. उपकरणे सहवीजनिर्मितीसाठी मुख्यतः लागतात ते बगॅस-फायर्ड म्हणजे उसाची चिपाडे जाळून उच्च दाबावर चालवले जाणारे बॉयलर, वापेवर चालणारी टर्बाइन्स आणि ही वीज मुख्य ग्रिडमध्ये सोडण्यासाठी लागणारी इंटरफेजिंग यंत्रणा. ही सर्व उपकरणे आपल्या देशात तयार होतात. सहवीजनिर्मितीमुळे इंधनवापराची कार्यक्षमता 60% पर्यंत किंवा त्यापेक्षाही वाढवता येते. अशा संचांची सहवीजनिर्मिती-क्षमता काही किलोवॅटपासून कित्येक मेगावॅटपर्यंत असू शकते. ह्याखेरीज, काही किलोवॅटथर्मल (kWth) पासून कित्येक मेगावॅटथर्मल (MWth) पर्यंत, ऊष्णताही त्याचवेळी तयार होते. खर्च साखर कारखान्यांत आजघडीला बसवलेल्या बगॅस-आधारित सहवीजनिर्मिती यंत्रणेसाठी सुमारे ३ ते ४ कोटी रुपये प्रति मेगावॅट इतका भांडवली खर्च येतो. असे दिसते की साखर कारखान्याचे ऊस-गाळप वर्षातून साधारणतः १६० दिवस चालते त्यामुळे सहवीजनिर्मितीसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. सुप्त क्षमता देशातील सध्या चालू असलेल्या साखर कारखान्यांतून सुमारे ३५०० मेगावॅटइतकी सहवीजनिर्मिती होऊ शकते. स्रोत: भारत सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाने काढलेली बायोमास पुस्तिका