गाझियाबाद जिल्ह्यातल्या करेरा खेड्यामध्ये श्रीकृष्ण गोशाळा आहे. तेथे दिल्लीच्या भारत सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जा मंत्रालयातर्फे, IIT च्या सहकार्याने, एक पथदर्शी प्रकल्प चालवला जात आहे. ह्या गोशाळेमध्ये सुमारे 1000 गायी आहेत. गाई, वासरे, बैल बांधण्यासाठी वेगवेगळ्या शेडस् आहेत तसेच गांडूळखत, कंपोस्ट खत आणि गुरांचे मूत्र गोळा करण्यासाठी केंद्रे आहेत. येथे तीन बायोगॅस संयंत्रे (85+85+60 घनमीटर /दिवस क्षमतेची) आहेत शिवाय मळी गोळा करण्याची टाकी आणि बायोगॅस शुद्ध करून तो टाक्यांत भरण्याचे एक बॉटलिंग संयंत्रही आहे. बायोगॅस संयंत्रे चालवण्यासाठी दररोज 5 टन शेण वापरले जाते. हा बायोगॅस शुद्ध केल्यानंतर वाहनांमध्ये वारला जातो. गॅस शुद्ध करण्यासाठीच्या वॉटर स्क्रबिंग यंत्रणेची क्षमता ताशी 20 घनमीटर आहे. हा बायोगॅस एका जनित्राला पुरवतात व त्याद्वारे वीजनिर्मितीही केली जाते. बायोगॅस संयंत्रामधली मळी तसे पाहिले तर निरुपयोगी असली तरी खत म्हणून तिचा वापर करणे अत्यंत फायदेशीर असते. ह्या मळीमध्ये शेणापेक्षाही जास्त पोषणमूल्ये असतात. गोशाळेच्या आवारातील झाडांना तर ती घातली जातेच शिवाय गांडूळखताशी संयोग करून ती विकलीही जाते. गोशाळेतील बायोगॅस संयंत्रे गांडूळखत करण्याची शेड 200 बार दाबावर काम करणारेबायोगॅस स्क्रबिंग व कॉँप्रेशन संयंत्र बायोगॅसने भरलेले सिलिंडर.ह्यांमार्फत वाहनास गॅस पुरवला जातो तांत्रिक माहितीसाठी पत्ता :डॉ. व्ही. के. विजयग्रामीण विकास व तंत्रज्ञान केंद्रआयआयटी, नवी दिल्ली – 110016इमेल: vkvijay@rdat.iitd.ernet.in , + 91 9871366611 गोशाळेचा पत्ता:श्री. वेद प्रकाश गोयलसचिव, श्रीकृष्म गोशाळा, गाझियाबादमोबाइल: + 91 9871093284