बायोमासपासून वीजनिर्मिती-मुख्य बिंदू भारतात दरवर्षी प्रचंड प्रमाणात बायोमास म्हणजे जैविक-कचरा तयार होतो कारण आपल्या देशात शेती, शेतीआधारित आणि जंगल-आधारित उद्योगांची संख्या खूप आहे. दरवर्षी अंदाजे ५०० दशलक्ष टन जैव-कचरा शेती व शेती-आधारित उद्योगांतून तयार होतो असे सांगतात. ह्या बायोमासमध्ये खूप ऊष्णता दडलेली असते. इतकी की तेनवढी ऊष्णता मिळवण्यासाठी आपणांस १७५ दशलक्ष टन वजनाचे तेल जाळावे लागेल. ह्या बायोमासचा काही हिस्सा, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मांडणीनुसार, चारा आणि जळण म्हणून वापरला जातो. तरीही अभ्यासातून असे दिसले आहे की जवळजवळ १५० ते २०० दशलक्ष टन बायोमासचा फारसा काही उपयोग केला जात नाही. अगदी कमी खर्चात ह्या बायोमासचा वेगळा वापर करता येईल. ह्या बायोमासमध्ये मुख्यतः धान्याची साले, टरफले आणि गवत-काड्यांचा समावेश असतो. ह्यापासून 15 000 ते 25 000 मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते. ह्याखेरीज पडीक जमिनींवर तसेच रस्त्याच्या किंवा लोहमार्गाच्या कडेनेसुद्धा हे बायोमास तयार करता येईल. ह्यापासून तर ७०००० मेगावॅटपेक्षा जास्त इतक्या प्रचंड प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकेल. अशारीतीने पक्त बायोमासपासून सुमारे 100 000 मेगावॅट वीज तयार करता येईल. तंत्रज्ञान कोळसा जाळून वीजनिर्मिती करणार्या पारंपारिक औष्णिक वीजकेंद्रांप्रमाणेच ह्या बायोमास-आधारित वीजकेंद्रांचे काम चालेल. जैविक कचरा बॉयलरमध्ये जाळून वाफ तयार केली जाईल आणि ह्या वाफेवर टर्बो-अल्टरनेटर फिरवून वीज तयार केली जाईल. बायोमास साठवून ठेवून त्याचा जरूरीनुसार वापर करता येत असल्याने विजेची बदलती मागणी पूर्ण करण्यासाठी ह्या केंद्रांची रचना करता येईल. फायदे कोणतेही नवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरज नाही कारण कोळसा जाळून वीजनिर्मिती करणार्या पारंपारिक औष्णिक वीजकेंद्रांप्रमाणेच ह्या बायोमास-आधारित वीजकेंद्रांचे काम चालेल. मुख्यतः ग्रामीण भागांतूनच मिळणारे बायोमास तेथेच वापरले गेल्याने तेथील वीजटंचाई दूर होऊ शकेल. एकाच वीजनिर्मिती केंद्रात विविध प्रकारच्या जैव-कचर्याचा उपयोग केला जाणार असल्याने लवचिकतेने काम चालवता येईल. खर्च बायोमासपासून वीजनिर्मितीचे केंद्र उभारण्यासाठी दर मेगावॅटमागे सुमारे ३ ते ४ कोटी रुपये खर्च येईल. अर्थात बायोमासची खरेदी किंमत, प्लँट लोड फॅक्टर म्हणजे पीएफ आणि ह्या रूपांतराची कार्यक्षमता ह्यानुसार हा खर्च बदलू शकतो. स्रोत: भारत सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाने काढलेली बायोमास पुस्तिका