हिरवी इमारत म्हणजे काय? हिरवी म्हणजे हिरव्या रंगाची नव्हे तर हिरवाई जपणारी म्हणजेच बांधताना आणि वापरताना नैसर्गिक संसाधनांचा कमीतकमी वापर करणारी इमारत. हिरवाई जपणारी रचना करण्यामागील हेतू असे आहेत - पुर्नवापरायोग्य नसलेल्या नैसर्गिक साधनस्रोतांची मागणी कमी करणे आणि अशा स्रोतांचा व संसाधनांचा अत्यंत कार्यक्षमतेने वापर करून घेणे उपलब्ध साधनस्रोतांचा जास्तीतजास्त पुर्नवापर आणि पुर्नचक्रीकरण करणे आणि पुर्नवापरयोग्य साधनस्रोत वापरणे ह्यासाठी कार्यक्षम बांधकाम साहित्याचा व बांधकामाच्या पद्धतींचा वापर केला जातो, साइटवर (जागेवर) मिळू शकणार्या स्रोतांचा उपयोग करून घेऊन वास्तुकलेच्या जैव-पर्यावरणीय पद्धतींचा वापर केला जातो. अशा इमारतीचे कामकाज चालवण्यासाठी व तिच्या वापरासाठी कमीतकमी ऊर्जा लागते. तिच्या प्रकाशयोजनेत आणि वातानुकूलन यंत्रणेत ऊर्जा-कार्यक्षम साधने वापरली जातात. कचरा व पाण्याचे योग्य व्यवस्थापन व पुर्नवापर केला जातो आणि इमारतीच्या आतील व्यक्तींना आरोग्यपूर्ण तसेच आरामदायी जीवनशैली पुरवली जाते. 'हिरव्या' इमारतीची वास्तुरचना करतेवेळी खालील घटकांचा एकात्मिक रूपाने विचार केला जातो - जागेवरचे नियोजन इमारतीच्या बाह्यातकाराची व भितींची (एन्व्हलप) रचना इमारतीच्या आतील यंत्रप्रणाली - HVAC (गरम करणे, वायुवीजन व वातानुकूलन), प्रकाशयोजना, विद्युतयोजना, गरम पाण्याची व्यवस्था जागेवरच ऊर्जानिर्मितीसाठी पुर्नवापरायोग्य ऊर्जास्रोतांचा एकात्मिक वापर कचरा व पाण्याचे योग्य व्यवस्थापन व पुर्नवापर पर्यावरणीय शाश्वतता देणार्या बांधकाम-साहित्याची निवड आणि वापर (पुर्नचक्र केलेल्या घटकांचा समावेश, उत्सर्जनाचे कमी प्रमाण इ.) अंतर्गत पर्यावरणाचा दर्जा (इमारतीच्या आतील हवेचा उत्कृष्ट दर्जा, योग्य तापमान राखणे व एकंदर वातावरण रुचिपूर्ण भासणे) हिरव्या इमारतीचा दर्जा ठरवण्याची पद्धत कोणती ? अशा इमारतींचे मूल्यांकन करणारी GRIHA (ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट) ही राष्ट्रीय पातळीवरची प्रणाली आहे. हिची रचना TERI ने केली असून भारत सरकारच्या नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालयाच्या सहयोगाने हिचा विकास केला गेला आहे. सर्व प्रकारच्या हवामानातील विविध रचनांच्या इमारतीचे मूल्यांकन करण्यासाठी ही प्रणाली उपयोगी आहे. अशा हिरव्या इमारती कोणत्या आहेत ? काही हिरव्या इमारती अशा - TERI रिट्रीट, गुरगांव CESE (सेंटर फॉर एन्व्हायरनमेंटल सायन्स ऍँड इंजिनिअरिंग) बिल्डिंग, आयआयटी कानपूर, उत्तर प्रदेश सुझलॉन वन अर्थ, सुझलॉन एनर्जी लिमिटेड, 'वन अर्थ', हडपसार, पुणे 411 028 अधिक माहितीसाठी http://www.grihaindia.org/index.php