प्रस्तावना नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरांमध्ये आदित्य सौरऊर्जा दुकाने उघडण्याची संकल्पना राबवीत आहे. ह्या दुकानांना आता अक्षय ऊर्जा दुकाने असे म्हटले जाते. ह्या दुकानांमधून पुर्नवापरायोग्य ऊर्जेवर चालणार्या साधनांची, सौरऊर्जा उत्पादनांसहित, विक्री व देखभाल (सर्व्हिसिंग) केली जाईल. ह्या दुकानांमधून खालील सुविधा पुरवल्या जातील पुर्नवापरायोग्य ऊर्जेवर चालणार्या तसेच ऊर्जेचा वापर कार्यक्षमतेने करणार्या साधनांची विक्री. पुर्नवापरायोग्य ऊर्जेवर चालणार्या साधनांची दुरुस्ती व देखभाल पुर्नवापरायोग्य ऊर्जेवर चालणार्या साधनांची व प्रणालींची माहिती पुरवणे आणि पुर्नवापरायोग्य ऊर्जेवर चालणार्या साधनांचा वापर वैयक्तिक तसेच व्यावसायिक पातळ्यांवर जास्तीतजास्त प्रमाणात केला जावा ह्यासाठी प्रसार करणे. आर्थिक मदत मिळण्यासाठी पात्र संघटना राज्यस्तरीय नोडल एजन्सीज्, खाजगी क्षेत्रातील उद्योजक व स्वयंसेवी संघटना देशातील सर्व जिल्ह्यांत अशी दुकाने उघडू शकतात. अर्थसहाय्य अर्जदारांना दुकान उभारणीसाठीच्या खर्चाच्या ८५% पर्यंत व जास्तीतजास्त १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज नेमलेल्या विशिष्ट बँकांकडून ७% दराने मिळू शकते व ते ५ वर्षांच्या मुदतीत फेडावयाचे असते. दुकानाच्या विशिष्ट उलाढालीनुसार राज्यस्तरीय नोडल एजन्सीजकडून आवर्ती अनुदान अथवा प्रोत्साहनपर रक्कम याप्रमाणे - - दरमहा रु.५०००/- आवर्ती अनुदान, मनुष्यबळ, वीज व दूरध्वनीची बिले व इतर विविध आवश्यक खर्चांसाठी.- दरमहा रु. ५०००/- प्रोत्साहनपर रक्कम (दुकान चालवण्याच्या पहिल्या वर्षात दरमहा किमान रु. ५०,०००/- व दुसर्या वर्षांत दरमहा रु. १,००,०००/- उलाढाल झाल्यास). ही योजना राज्यस्तरीय नोडल एजन्सीज् व आयआरइडीए मार्फत चालवली जाईल. दुकान उभे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रत्येक जिल्ह्यात असे एकच दुकान चालवता येईल. ज्या जिल्ह्यांमध्ये असे दुकान आधीपासूनच असेल ते जिल्हे ह्या योजनेस पात्र ठरणार नाहीत. दुकानाचे क्षेत्र कमीतकमी २०० चौफूट असले पाहिजे (साठवणुकीची जागा सोडून). हे दुकान बांधलेले, मालकीचे अथवा पुर्नसजावट केलेले असावे. भाडेतत्त्वावरील दुकानास शासकीय मदत मिळणार नाही. दुकान शहराच्या मध्यवर्ती व चांगल्या भागात असावे. देशभरातल्या अशा दुकानांना एकच नाव दिले जाईल व ते म्हणजे अक्षय ऊर्जा दुकान. हे नाव कमीतकमी ८’x३’ आकाराच्या निऑन-साइनवर दाखवले जाईल. अर्थात ह्यामध्ये मालकाचे नाव किंवा एखादा इतर शब्द सुरुवातीस लिहिता येईल, उदा. “……अक्षय ऊर्जा दुकान” दुकानाची अंतर्गत सजावट, मांडणी व रचना चांगल्या दर्जाची व ग्राहकांना आकर्षित करेल अशी असावी. दुकानात कमीतकमी दोन कर्मचारी असावे व त्यांमधील एकास पुर्नवापरायोग्य ऊर्जेवर चालणार्या साधनांची दुरुस्ती व देखभाल करण्यासंबंधीचे तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्थात ह्या कर्मचार्यां संबंधीची कोणतीही जबाबदारी नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालयावर नाही. दुकान व्यावसायिक पद्धतीने चालवले जावे ज्यायोगे त्यामधून भरपूर उलाढाल होईल. ह्या दुकानांमधून विकल्या गेलेल्या मालाची दुरुस्ती तसेच देखभाल तर केली जाईलच, ह्याशिवाय इतरांकडून तसेच अन्य ठिकाणी खरेदी केलेल्या पुनर्वापरयोग्य ऊर्जेवर चालणार्या साधनांची दुरुस्ती व देखभालदेखील वाजवी दरात केली जाईल. अशा दुकानी ग्राहकांना मैत्रीपूर्ण व सौहार्दाची वागणूक मिळावी, त्यांना तुच्छतेने व मालकाच्या मर्जीनुसार वागवले जाऊ नये. ह्या दुकानात विविध उत्पादकांनी बनवलेली पुर्नवापरायोग्य ऊर्जेवर चालणारी साधने उपलब्ध असणे गरजेचे आहे ज्यायोगे ग्राहकाला निवडीस मोठा वाव राहील. ह्या दुकानातून विकल्या जाणार्या मालाच्या किंमती ग्राहकांना स्पष्टपणे दिसतील अशा रीतीने लिहिणे आवश्यक आहे. तसेच येथे येणार्या व्यक्तीस पुर्नवापरायोग्य चालणार्या साधनांची व प्रणालींची माहिती पुरवली जायला हवी. सौरऊर्जेचे हे दुकान व्यावसायिक दृष्टीने नीट चालण्यासाठी तेथून कार्यक्षमतेने ऊर्जा-वापर करणार्या इतर साधनांचीही विक्री करता येईल – उदा. कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट प्रकारचे दिवे उर्फ सीएफएल, प्रकाशयोजना-उपकरणे, रॉकेलवर चालणारे उच्च कार्यक्षमतेचे स्टोव्ह इ. ग्राहकाच्या हितासाठी व सोयीकरिता अशा उत्पादनांच्या खरेदीसाठी सुलभ कर्ज देणार्या बँकाच्या सेवाही ह्या दुकानामार्फत मिळू शकतील. स्रोत : www.mnre.gov.in