ऑक्टोबर 1997 पूर्वी

एखाद्या खेड्याच्या राजस्व सीमेमध्ये, कोणत्याही कारणास्तव, विजेचा वापर होत असल्यास त्या खेड्याचे विद्युतिकरण पूर्ण झाले असे मानले जाई.

ऑक्टोबर1997 नंतर

एखाद्या खेड्याच्या राजस्व सीमेमधील लोकवस्तीच्या भागामध्ये, कोणत्याही कारणास्तव, विजेचा वापर होत असल्यास त्या खेड्याचे विद्युतिकरण पूर्ण झाले असे मानले जाते

2004-05 साली विद्युतिकरणाची नवी व्याख्या लागू झाली आहे

(ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार. पत्र क्र. 42/1/2001-D(RE) दि. 5 फेब्रुवारी 2004 आणि त्यास पुरवणी पत्र क्र. 42/1/2001-D(RE) दि.17 फेब्रुवारी 2004.)

ह्या व्याख्येनुसार, खालील बाबी पूर्ण झाल्यानंतर, विद्युतिकरण पूर्ण झाले असे मानले जाते :

मुख्य वस्तीमध्ये तसेच (असल्यास) दलित वस्तीमध्ये मूलभूत संसाधने स्थापित असणे – उदा. वितरण रोहित्र (ट्रांसफॉर्मर), वितरण तारा इ.

शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य केंद्र, दवाखाने, समाजमंदिर इ. सारख्या सार्वजनिक ठिकाणी वीज पोचलेली असणे.

तेथील एकूण घरांपैकी किंमान 10% घरांमध्ये वीज पोचलेली असणे.

स्रोत :  ऊर्जा मंत्रालय