अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्य शासनाची योजना अ.क्र.योजनासविस्तर माहिती १ योजनेचे नांव गटई स्टॉल योजना २ योजनेचा प्रकार राज्य शासनाच्या योजना ३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. ४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. ५ योजनेच्या प्रमुख अटी अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न : ( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे. (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा. अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील. ६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप रस्त्याच्या कडेला काम करणाया कारागिरांना गटई स्टॉल पुरविण्याची योजना १०० टक्के अनुदान तत्वावर, आयुक्त समाजकल्याण पुणे व या महामंडळामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येते. ७ अर्ज करण्याची पध्दत अर्जाचा नमुना जिल्हा समाजकल्याण कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे. ८ योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती ९ संपर्क कार्यालयाचे नांव सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय स्त्रोत :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन