राज्य पुरस्कृत योजना 50% टक्के अनुदान योजना उद्देश चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू. 50000/- कर्ज मिळू शकते व या अर्थसहाय्यापैकी रू. 10000/- कमाल मर्यादेपर्यंत 50% कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. ही योजना जिल्हा स्तरावर जिल्हा व्यवस्थापकांमार्फत राबविली जाते. शैक्षणिक पात्रता आवश्यकता नाही वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी - रु.39,308 /- आणि शहरी भागासाठी - रु.54,496/- कर्जमर्यादा कमाल रू.50,000/- बँकेचा सहभाग व व्याजदर प्रकल्प गुंतवणुकीच्या 50% आणि व्याज बॅकेच्या कर्जावर द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्के दराने अर्जदाराचा सहभाग नाही अनुदान प्रकल्प गुंतवणुकीच्या 50% व कमाल रू.10,000/- मर्यादेत. हमी दोन सरकारी नोकरदारांचे हमीपत्र तारण बँकेच्या नियमानुसार इतर अटी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवाशी असावा. अर्जदाराने अन्य शासकीय संस्थांकडून अनुदान घेतलेले नसावे व तो कोणत्याही संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असावा. अर्जदाराने सादर केलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला असावा. कर्जाची परतफेड 36 ते 60 मासिक हप्त्यात अर्ज करण्याची कार्यपध्दती कर्ज प्रकरणाच्या जलद निपटा-यासाठी अर्जदाराने प्रथम ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्जान्वये प्राप्त झालेला Provisional No. आपल्या अर्जात नमूद करुन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नजिकच्या महामंडळाच्या कार्यालयात सादर करण्यात यावा. आवश्यक कागदपत्रं 1. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला 2. उत्पन्नाचा दाखला 3. जातीचा दाखला 4. नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो 5. शिधापत्रिकेची छायाप्रत 6. व्यवसायासाठी लागणा-या स्थावर मालमत्तेच्या किंमतीचे दरपत्रक 7. अर्जदारास ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा किंवा भाड्याचे करारपत्र 8. अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असल्याचा दाखला व क्रमांक. ऑनलाईन अर्ज अर्जाचा नमुना माहिती संकलक : अतुल पगार स्त्रोत : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित