वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ समाजातील दारिद्रय रेषेखाली जीवनमान जगणाया विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांचा विकास करण्याच्या दॄष्टीने महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 फेबु्रवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना केलीे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिक दॄष्टया दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय्य देण्यात येऊन त्यांच्या आर्थिक , शैक्षणिक व सामाजिक उन्नतीकरीता महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. विशेष मागास प्रावर्गातील जातींना कर्ज पुरवठा करण्याकरीता वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास प्रााधिकॄत वाहीनी म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ राष्ट्रीय मागासवर्ग वितीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांची अधिकॄत वाहिनी म्हणून कार्यरत आहे. स्त्रोत : http://www.vnvjntdc.com/marathi/eligibility.aspx