१. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची योग्य साफसफाई केली जाईल याची काळजी घेणे.

२. पावसाळ्यात पाणी तुंबल्यास ते पाणी निचरा करण्याची व्यवस्था सज्ज ठेवणे.

३. आपत्तीच्या काळात नागरिकांना शुध्द व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.

४. आपल्या भागात नियमितपणे जंतुनाशकांची फवारणी करणे.

५. आपत्तीग्रस्त भागात अग्निशमन दलाची सेवा कार्यरत करणे.

६. आपत्तीग्रस्त विभागात लोकांना मदत आणि सोडवणूकीची कार्य करणे.

७. आपत्तीच्या काळात जखमींना प्राधान्याने दवाखान्यात/ इस्पितळात औषधोपचार करणे.

८. आपत्तीमुळे निर्माण झालेल्या घाणीची विल्हेवाट लावणे.

९. अधिक मदतीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्याधिकारी जिल्हा नियंत्रण कक्षासी संपर्क साधावा.

१०. आपल्या विभागातील संसाधनाची माहिती www.idrn.gov.in   या वेबसाईट अद्यावत करण्यासाठी माहिती उपलब्ध करून देईल.

११.आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनास बसेस उपलब्ध करून देणे.

१२.आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास दर दोन तासांनी घटनेविषयी माहिती देईल.

माहिती संकलन: बाळू भांगरे

माहिती स्रोत : आपत्ती जोखीम कार्यक्रम, जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा नियंत्रण कक्ष, गडचिरोली