ऋतू निहाय प्रत्येक गाव व गटाची दिनचर्या, कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. जसं महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्या झोपेतून उठण्याची वेळ वेगवेगळी असते. काही गावात महिला लवकर उठून आवरा-आवर करतात.शेतकरी महिलां बरोबरच उठून गायी- म्हैशीचं दुध काढतात. मुलं बहुदा उशिरा उठतात.या उलट नोकरदार कुटुंब असेल तर महिला लवकर उठतात. पुरुष व मुले उशिरा उठतात. या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट नमुन्यात भरल्या तर त्या गावाचं दिनचर्या घडयाळ तयार होईल व ठराविक वेळेत कोण काय काम करतं? कोण कुठं असतं?याची माहिती मिळेल. त्या माहितीच्या आधारे आपत्तीचं नियोजन करणं सोपं होईल.यामुळे दिनचर्या घड्याळास आपत्ती व्यवस्थापन घडयाळ असंही म्हणता येईल. दिनचर्या घडयाळाचे उद्देश/ फायदे १. आपत्तीच्या प्रंसंगी कोण कुठे आहे? हे बाहेरील लोकांना किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींना कळवे. त्या प्रमाणे संकट ग्रस्तांना मदत करणं सोपं होईल. २.आपत्ती प्रसंगी सर्वात अगोदर दुर्बल घटकांना मदत करणं सोपं होईल. उदा. लहान मुले, अपंग,वृध्द इत्यादी. ३.या दिनचर्या / आपत्ती व्यवस्थापन घड्याळाचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात वापर करून सरकारला सादर केलं तर मदत कार्य अधिक प्रभावी होईल. ४. विविध सामाजिक संस्था किंवा सरकार यांना तेथिल लोकांन सोबत त्यांच्या वेळेनुसार काम करता येईल. कसं तयार कराल? दिनचर्या घडयाळ तयार करताना लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणुन त्यासाठी प्रत्येक गटातील प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. उदा. शेतकरी, महिला, शाळेतील मुले, युवक, वृद्ध, नोकरदार. १.सर्व प्रथम एक कार्डशीट पेपर घेऊन त्यात स्केज पेनच्या साह्याने गटानुसार गोल वर्तुळे काढा. ( चित्रात दाखवल्या प्रमाणे) वर्तुळ काढताना एक काळजी घ्या की त्यात लेखन करता येईल. २.त्यानंतर अगदी आतल्या लहान वर्तुळात घड्याळाचे १ ते २४ पर्यंतचे आकडे लिहा. ३.मग गटनिहाय रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंतची दिनचर्या त्या त्या वर्तुळात लिहा. ४.संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यांनतर त्याचे त्याच ठिकाणी वाचन करून त्यातील त्रुटी दुरुस्त करा. ५.तयार केलेले दिनचर्या घडयाळ रंगारीच्या ( पेंटर)मदतीने गावातील सावर्जनिक ठिकाणी व्यवस्थित काढा. ( कमीत कमी गावात ३-४ ठिकाणी काढा.) दिनचर्या घडयाळ तयार करताना येणाऱ्या अडचणी व उपाय १.बऱ्याचदा गटाची दिनचर्या सारखी नसल्याने दिनचर्या घडयाळ बनविताना अडचणी येतात. जसं प्रत्येक शेतकऱ्यांची दिनचर्या सारखी नसते. अशा वेळी त्या गटाची कॉमन दिनचर्या नोंद करावी. माहिती लेखन: बाळू निवृत्ती भांगरे, खडकी बुद्रुक, ता.अकोले.