माझे नाव शोभा जालिंदर तुपे आहे .मी बाबरगाव खेड्यातील इंद्रनगर या वस्तीवर राहते .हि वस्ती गावापासून २ कि.मी. अंतरावर आहे.मी माझे कुटुंब शेतीव्यवसाय करायचो शेतीवर पुर्णपाने अवलंबून राहयचो.माझे पती गवंडी काम करतात जेव्हा त्यांना काम मिळायचे तेव्हाच त्यांना पैसे मिळायचे.मग मी पण दुसऱ्यांचा शेतात मजुरीने कामाला जायचे. घरात जे काही मोल मजुरीचे पैसे यायचे ते सर्व घर चालवण्यात खर्च होत होते.शेतीतून मुद्दळपण मिळत नव्हती आणि त्यात दुष्काळाने पाणी कमी व्हायचे आणि पीके जळून जायची.मोल मजुरीचे पैसे,किराणा,मुलांचे शिक्षण,दवाखाना यात खर्च व्हायचे. कसलीच बचत होत नव्हती मग एक दिवशी वाटरशेड ऑर्गनायझेशन संस्थेचा भेंडे म्याडम आमचं वस्तीवर आल्या.त्यांनी आम्हाला बचत गटाची माहिती दिली,आम्हाला पण गटाचे महत्व पटले.त्यांनी गटामुळे तयार होणारी एकजूटीची ताकद,बचत व गटाचे फायदे समजावून सांगितले.मग आम्ही २०१५ मध्ये शिवशक्ती महिला बचत गट स्थापना केली. हा गट आम्ही १००/- रू बचती प्रमाणे सुरु केला.मग म्याडमच्या मार्गदर्शनाखाली गटाचा अंतर्गत व्यवहार सुरु केला.मग हळू हळू आमचा व्यवहार वळू लागला. मग मी गटातून कर्ज घेऊन छोटी सिंगल फेज गिरणी विकत घेतली.यामुळे मला रोज नगदी व्यवसाय मिळाला.त्या नंतर आमचा गटाने ICICI बँकेचे कर्ज घेतले या कर्जातून व अजून काही पैसे टाकून मी एक छोटे किराणा दुकान उघडले.या पूर्वी वस्तीवर एक काडीपेटी जरी लागली तरी २ किलोमीटर गावात जाऊन आणावी लागायची पण आता वस्तीवर किराणा दुकान झाल्यामुळे माझा व्यवसाय अजून वाढू लागला.यातून नफा पण होऊ लागला.आता गटाची बचत बँकेचे कर्ज यांचातून सहज फेडता येत आहे. मला आनंद आहे कि वाटर संस्थेने आमचे गाव निवडले.गावात बचत गट तयार केले आरोग्य प्रकल्प राबवत आहे.यामुळे आमचा कुटुंबाचा सर्वांगाने फायदा होत आहे.या बद्दल मी संस्थेचे खूप आभारी आहे. लेखक - शोभा जालिंदर तुपे शिवशक्तीमहिला बचत गट- बाबरगाव (वस्ती) स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट