देगलूर हे नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. तेलंगान आणि कर्नाटक सीमेलगत वसलेल्या या तालुक्यात नक्षलवाद्यांचा उपद्रव झालेला आहे. अशा या गावात प्रशिक्षणार्थी पी.एस.आय. म्हणून कु.श्रीदेवी पाटील 2013 मध्ये रुजू झाल्या होत्या तेंव्हा पासून त्या देगलूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत . कर्तव्यदक्ष आणि डेअरिंगबाज महिला पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी आपला वचक बसविला आहे. पण केवळ दबंगगिरी न करता महिला सबलीकरण व बाल मजुरी निर्मूलन यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजाविली आहे. ड्युटी एके ड्युटी असे न करता मार्केट मध्ये फिरताना, सिव्हिल ड्रेसवरही त्या रोड रोमियोंचा समाचार घेतात .अगदी देगलूरला जॉईन झाल्या बरोबर रस्त्यावर जाणाऱ्या मुलींची टांटिंग करून छेड काढणाऱ्या दोनतीन सडकसख्याहारीना श्रीदेवी पाटील यांनी पकडून ठाण्यापर्यंत काठीचा प्रसाद देत झोडपत नेले. देगलूर मध्ये त्यांची व त्यांच्या या कामाची चर्चा सुरू झाली व रोडसाईड रोमियोंना वचक बसला. या फर्स्ट इम्प्रेशनने त्यांच्या पर्यवेक्षाधीन सेवेची सुरुवात झाली आहे. याच काळात वरिष्ठ अधिकर्यानी त्यांच्यावर मुखेड येथील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकण्याची सोपवलेली होती.आपले पथक घेऊन त्यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. श्रीदेवी पाटील यांनी पोलीस-पब्लिक संबंध जिव्हाळ्याचे व विश्वासाचे व्हावेत म्हणून सोशल पोलिसिंगचे अनेक उपक्रम राबविले आहेत . दरमहा पोलीस ठाण्यात देगलूर मधील सुशिक्षित महिलांना आमंत्रित करून त्यांच्याशी श्रीदेवी पाटील संवाद साधतात दरवेळी नव्या शिक्षीत महिलांना बोलावून त्या कायद्याचे पालन व रक्षण कसे करू शकतात हे समजून देतात. आदिवासी आश्रम शाळेत अनेकदा गैर प्रकार होतात. विद्यार्थिनीवर अत्याचार,निकृष्ट जेवण देणे ,रॅगिंग असे प्रकार होऊ नयेत म्हणून कोणत्याही वेळी ड्युटीचा भाग नसताना, श्रीदेवी पाटील देगलूर तालुक्यातील आश्रम शाळांना सरप्राईज व्हिजिट देतात. दिले जाणारे जेवण तपासतात. आणि मुलींना सर्व प्रकारच्या आवश्यक सुविधा आहेत की नाही याची तपासणी करतात. देगलूर तालुक्यातील अनेकजण शेजारच्या तेलंगाणा राज्यात आपल्या मुली देतात. लग्न करताना श्रीमंती जमीन जुमला बघीतला जातो . आपला जावई कसा आहे?त्याला कोणती व्यसने आहेत. वगैरे न तपासता थाटात लग्न करून दिले जाते .पण महिनाभरात या मुलींना माहेरी पाठविले जाते, संसार मोडतात आणि परित्यक्ता महिलांचे प्रश्न तयार होतात. श्रीदेवी पाटील यांनी गुन्हे दाखल न होऊ देता सासरची माणसे माहेरची माणसे पती पत्नी ,यांचे समुपदेशन करून अनेकांचे संसार जुळविले आहेत.यासाठी जवळपास 80 कार्यक्रम घेतले आहेत. बालकामगारांची सुटका देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही उपहारगृहे,विटभट्ट्या, बांधकामे, शेती,दुकाने सर्वत्र बालमजूर आहेत 14 वर्षांखालील मुलांना गरीबीमुळे अनेक पालक शाळे ऐवजी कामावर पाठवतात . या विषयाचा अभ्यास करून श्रीदेवी पाटील यांनी हाटेल मालक ,मुलांचे पालक यांचे समुपदेशन करून 51 बालमजुराची सुटका केल्याने अनेक मुले शाळेत जात आहेत. 'प्रतिसाद 'ऐप चा प्रचार महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी संकटात सापडलेल्या महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलीस खात्याने 'प्रतिसाद' नावाचे मोबाईल मोबाईलऐप तयार केले आहे .श्रीदेवी पाटील यांनी शाळा महाविद्यालयात जाऊन आणि विविध महिला मंडळात कार्यक्रम घेऊन त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे देगलूर शहरात अनेक विद्यार्थिनी व महिलांच्या मोबाईलवर pratisad ape डाउनलोड करण्यात आलेले आहे. या ऐप मुळे 28611118 डायल करताच जिने दस्यल केले त्या संकटात सापडलेल्या महिलेच्या चार जवळच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर मेसेज जातो. आणि पोलिसांनाही लोकेशन कळते व तात्काळ मदत पोचविली जाते. अनेकदा आवारा मुलांच्या कारवायांना कंटाळून महाविद्यालयीन मुली शिक्षण सोडतात. श्रीदेवी पाटील यांनी महाविद्यालयात मुलींच्या बैठका घेऊन त्यांना स्वतःचा whatsapp नंबर दिला आहे.शिवाय महाविद्यालयांच्या प्रचार्याना तक्रार पेटी ठेवायला सांगितलें आहे . ही तक्रार पेटी दरमहा पाटील यांच्या उपस्थितीत उघडते. सर्वांना पोलीस आपले मित्र वाटावेत यासाठी श्रीदेवी पाटील विविध कार्यक्रमात भाग घेतात. दर राखी पौर्णिमेला पोलिस ठाण्यात टेंट टाकून त्या रक्षाबंधन कार्यक्रम घेतात. महिला अधिकारी असूनही त्या इफ्तार पार्टित सहभागी होतात. सोशल पोलिसिंग चा फायदा काय ? असे विचारले असता पाटील म्हणाल्या .अनेकदा अनपेक्षितपणे लोक बंदोबस्तात,गुन्ह्याच्या तपासात मदत करतात.त्यांचा खाकीबद्दलचा विश्वास वाढतो आणि गुन्हेगारांना तातडीने गजाआड करता येते. या डाशिंग नेचरचे श्रेय श्रीदेवी आपलेे मुख्याध्यापक्ष असलेले वडील बळीराम पाटील यांना देतात .त्या सांगत होत्या " माझ्या वडिलांनी आम्हा भावंडात,मुलगा-मुलगी असा कधीच फरक केला नाही. बुलढाणा जिल्ह्यात मोताळकर पोफळी हे माझे गाव .नवोदय विद्यालयात मी शिकले ,पुढे आय ए एस व्हायचे हे ध्येय ठेऊन बारावी नंतर मी पुण्याला एम पी ला कलेजमध्ये एल एल बी केलं .महाविद्यालयीन जीवनात मी बास्केट बाल ,व्हॅलीबाल या स्पर्धात राज्य पातळी वर खेळलेय, व अनेक पारितोषिके मिळवळीत पुढे चान्स घ्यावा म्हणून मी पी एस आय ची परीक्षा दिली आणि निवडली गेले. हाही अनुभव घ्यायचा असे ठरवून मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहे. महिला पोलीस अधिकारी म्हणून मी कुठल्याच सवलती घेत नाही. डेडबाडीचा पंचनामा ,पोस्टमार्टम, खुनाचा तपास,अवघड पोलीस बंदोबस्त,गुन्हेगारांशी सामना ,अशी दिलेली कामे, आव्हान म्हुणून स्वीकारते यामुळेच माझ्याकडे अनेक मानसन्मान चालत आले आहेत.माझ्या या नोकरीत कामाची वेळ ठरलेली नसते ,नेहमी अलर्ट राहावे लागते.रोजच झोपायला बारा,एक वाजतात पण मी या नोकरीवर खुश आहे. कामावर समाधानी आहे. लेखक - सु.मा.कुळकर्णी, नांदेड