भारतात मुलांविरुद्ध गुन्हे / अपराध लहान मुलांवर अत्याचार सर्यासपणे होतात पण त्यातील काही गुन्हयांचीच तक्रार केली जाते.एका सर्वेक्षणानुसार ५३% मुलांनी आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळेस वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक अत्याचार अनुभवला आहे.बऱ्याच केसेस मध्ये गुन्हेगार हा कुटुंबातीलच कुणी व्यक्ती, नातेवाईक किंवा मित्र असतो.अशा केसेस मध्ये बळी पडलेली मुले या गुन्हयाविषयी तक्रार करत नाही.लैंगिक अत्याचारामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर होणारे गंभीर परिणाम आयुष्यभर राहतात.जे मुलं लैंगिक अत्याचाराला बळी पडतात त्यांना मानसिक कमजोरी, हिंसकवृत्ती, नैराश्य आणि अस्वस्थता अशा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.स्वतःविषयी लाज वाटणे, अपराधीपणाची भावना मनात निर्माण होणे सोबतच कमकुवत परस्पर संबंध आणि ढासळलेला आत्मविश्वास हे लैंगिक अत्याचाराची आणखी काही परिणाम आहे. मुलांसाठी पॉस्को ई-बटन -एक सुरवात लैंगिक गुन्हयापासून मुलांचे संरक्षण (Protection of children from sexual offences) पॉस्को इ-बॉक्स हे लैंगिक अत्याचारविरुद्ध तक्रार करण्यासाठी ऑनलाइन बॉक्स आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (National Commission for protection of child Rights) अशा प्रकारे होणाऱ्या गुन्ह्याची तक्रार थेट आयोगाकडे करता यावी यासाठी घेतलेला हा पुढाकार आहे. इ-बॉक्स, हे वापरण्यास सोपे आणि तक्रारीची गुप्तता पाळण्यासाठी मदत करते. लैंगिक गुन्हयापासून मुलांचे संरक्षण कायदा २०१२ नुसार सोप्या पद्धतीने तक्रार करण्यासाठी आणि वेळेवर गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यासाठी ही ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली उपयुक्त ठरते. कार्यप्रणाली (हे कसे कार्य करते?) राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग च्या वेबसाईटवर इ-बॉक्स वापरण्यासाठी होम पेज वर इथे क्लिक करा च्या लिंक चा ठळकपणे उल्लेख केला आहे. जिथे वापर करण्याऱ्याला POCSO इ-बॉक्स नावाच्या बटनेला क्लीक करावे लागेल. पहिला टप्पा ही लिंक ऍनिमेशन चित्रपट असलेल्या विंडो वर घेऊन जाईल. हा चित्रपट लहान मुलांना खात्री करण्यात मदत करतो कि जे काही त्याच्या/तिच्या सोबत घडलंय यात त्याचा/तिचा काही गुन्हा नाहीं आणि त्याला अपराधी वाटून घ्यायची गरज नाहीं आणि बालहक्क संरक्षण आयोग (National Commission for protection of child Rights) हे त्यांचे मित्र असून त्यांना मदत करणार आहेत. दुसरा टप्पा जेव्हा वापरकर्ता (user) त्या पेज वरील एर्रो ला क्लिक करतो तेव्हा ते दुसऱ्या पेज वर जात जिथे त्याला/तिला कमीत कमी एका चित्राची निवड करावी लागते ज्यात त्याच्यासोबत झालेल्या अत्याचाराचे वर्णन केलेले असेल. तिसरा टप्पा मोबाईल नंबर,ई-मेल आणि झालेल्या प्रसंगाची विस्तृत माहिती भरून हा फॉर्म जमा करा.यानंतर तक्रारीची नोंद होईल आणि एक तक्रार क्रमांक तुम्हाला मिळेल. POCSO कायद्याविषयी लहान मुलांवर होणाऱ्या गुन्ह्याची माहिती असल्यामुळे सरकारने लैंगिक गुन्हयांपासून मुलांचे संरक्षण (Protection Of Children from Sexual Offence) कायदा २०१२ ची स्थापना केली म्हणजे त्यातून लहान मुलांवरून लैंगिक अत्याचार,हल्ले आणि अश्लील साहित्य निर्मितीसाठी केला जाणारा वापर थांबवता येईल.तसेच न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर लहान मुलांचे संरक्षण करता येईल त्यामध्ये मुलांना मैत्रीचे वातावरण निर्माण करून गुन्ह्याचा तपास,पुराव्याची नोंद करून विशेष नियुक्त न्यायालयांमध्ये त्यावर खटले चालवता येतील. कुठलाही १८ वर्षापर्यंतच्या व्यक्ती हा POCSO कायद्यानुसार बालक म्हणूनच ओळखला जातो. स्त्रोत : राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग (NCPCR)