एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत किशोरींना सक्षम बनविण्यासाठी सन २००० पासून "किशोरी शक्ती" योजना चालविण्यात येत आहे. यामुळे किशोरवयीन मुली आपली वाढ व पूर्ण क्षमतेचा विकास करून आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडू शकतील या योजनेची प्रमुख उद्दिष्टे ११ ते १८ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचा पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे किशोर वयातील मुलींना घरगुती व व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे व अर्थार्जनासाठी सक्षम बनवणे किशोरवयींन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन व व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता इ. विषयीचे शिक्षण देऊन त्यांना जागृत करणे व बालविवाहास प्रतिबंध करणे. किशोरवयीन मुलींना निर्णयक्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून अनौपचारिक शिक्षण देणे अधिक माहितीसाठी महिला व बालविकास विभागाचा १४ सप्टेंबर २००६ चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा स्त्रोत : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन