आता तरी बायांनो बोलक्या व्हा गं ... आता तरी बायांनो बोलक्या व्हा गं आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विचार कराल का गं बुद्धिमत्तेला चालना मिळेल ना गं आता तरी बायांनो बोलक्या व्हा II १ II बाहेर पडायला भिऊ नका गं दडपशाहीला मागे हटवा गं दडपून बुजऱ्या राहू नका गं अन्यायाला वाचा फोडू या गं आता तरी बायांनो बोलक्या व्हा II २ II शिबिरात यायला तयर व्हा गं जोडीला चार जणी घेऊन या गं एकजुटीचे बळ सर्वांना दावू या गं आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ३ II आपल्या अडचणी आपण सोडवू बचत गट भक्कम करू गावातील अडचणी शोधून काढू आपल्या हिमतीनं सोडवून दावू गं आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ४ II मिटींगला वेळेवर आपण जाऊ आपल्या अडचणी गटात मांडू गटाच्या अडचणी गटात सोडवू एकजुटीने राहून दाखवू ग आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ५ II रात्रीच्या शाळेला जाऊन शिका गं कशाला शिकायचं ? म्हणू नका गं कागदावर अंगठा लावू नका गं शिकायची हिंमत सोडू नका गं आता तरी बायांनो बोलक्या व्हा II ६ ईई लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका