खेड्यातील महिलांना केवळ काबाडकष्ट आणि चुल एवढयाचं मर्यादा परंतु महिला आज जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक क्षेत्रात आपले कतृत्व सिध्द करीत आहे. जिद्दीच्या जोडीला अहोरात्र मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणताही उद्दोग महिलांसाठी अवघड नाही. हा संदेश आपल्या कतृत्वातुन सिध्द केलाय अति गरीब कुटुंबातील महिलांनी व हे सर्व झाले शक्य झाले स्वंयसाहय बचत गटाच्या माध्यमातुन. हि यशकथा आहे यवतमाळ जिल्हयातील आर्णी तालुक्यातील लोहणबेहळ गावातील महिलांची.

येथील १० महिलांनी अवघड परिस्थितुन लेअर म्हणजेच अंडी देणा-या कोंबडीचा एक छोटासा फार्म सुरु केला असुन हा फार्म इतर महिलांसाठी आदर्श ठरत आहे. या व्यवसायातुन दररोज पैसा महिलांच्या हातात राहत असुन त्यांना आता दुस-याच्या शेतावर कामाला जाण्याची गरज नाही असे कल्पनाताई मंगाम सांगतात. यवतमाळ जिल्हयातील आर्णी पासुन १० कि.मी. अंतरावरील लोहणबेहळ येथील गावराणी अंडी देणा-या कोंबडीचा फार्म शहरातील लोकांचा आकर्षण बनला आहे. हा व्यवसाय चांगलाचं नावारुपाला आला आहे. जयसंतोषी माता बचत गटाच्या या महीलांनी मोठया धाडसाने हो व्यवसाय सुरु केलाय याला साथ मिळाली ती महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमची. शासनाच्या कृषी समृध्दी (केम) प्रकल्पाच्या माध्यमातुन सुरवातीला गिरिराज व वनराज जातीची कोंबडीची २५ पिल्ले अनुदानातुन देण्यात आली होती. यापासुन त्याना अधिक मिळकत मिळाली. दररोज रोजमजुरीला जावुन कष्टाचे काम करणे थांबले.

माविम व्दारा कुक्कुटपालनाचे शास्रोक्त प्रशिक्षण बचत गटातील महिलांना देण्यात आले. महिलांची उपजिविका शाश्वत करण्याच्या दृष्टीने या बचत गटातील महिलांना माविम ने डेफ्ट फंड (बुडीत कर्ज साहयत्ता निधी) दिला. या निधीतुन महिलांची माविमच्या मार्गदर्शनात इंडब्रो या देशी अंडी देणा-या कोंबडयांची हैद्राबाद येथुन खरेदी केली. हा व्यवसाय त्याना सोयीचा वाटत असुन त्याना यातुन त्याना दररोज पैसा हाती दिसतो. एका पक्षाची अंडी देण्याची क्षमता २८० अंडी देण्याची आहे. यांच्या खाद्याचा बेस हा मक्का व सोयाबीन असुन त्यांना स्वच्छ पाणी नियमित दिल्या जाते. कोंबड्याची शेड ची नियमित स्वच्छता केली जाते.

दुष्काळी परिस्थीतीत एक शाश्वत उपजिविकेचा मार्ग त्याना गवसला असुन दररोज २५० अंडी यवतमाळ शहरात माविम शेत ते थेट परिवाराच्या माध्यमातुन विकली जाते. त्यांच्या एका अंड्याला ९ रु. दर मिळत असुन खाद्याचा खर्च वजा जाता ११०० रुपये निव्वळ नफा मिळत आहे. मोठ्या जिद्दीने त्यांनी हे आव्हान स्विकारलम असुन आता मोठी झेप घेण्याचं त्यांच स्वप्न आहे. महिलांनी ठरवल तर ते कुठल्याही क्षेत्रात प्रगती करु शकतात. हे या महिलांनी सिध्द करुन दाखवल आहे. त्यांच हे यश समाजात महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल यात काही शंका नाही.

शेख रसुल
उपजिविका विकास सल्लागार
महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ