उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी गाव. गावात पाण्याचा त्रास होताच. त्यात गावातले लोक म्हणावे तेवढे सक्रिय नव्हते. गावातलं शिक्षक जोडपं अमोल आणि विशाखा अंधारे हे गावात बदल घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. आणि त्यातच वाॅटर कप २०१७ ची घोषणा झाली. गाव या स्पर्धेत सहभागी झालं. आणि जलसंधारणाची कामं जोरात सुरु झाली. गावाला विकास हवा होता, फक्त त्या विकासाचा मार्ग अमोल सरांनी दाखवला. गाव जादू झाल्याप्रमाणे एक झालं. कालावधी - 4.41 मिनिट स्त्रोत - पाणी फौंडेशन शिक्षकांच्या प्रयत्नातून गाव घडलं .