मृत्यु नोंदणीचे महत्त्व

मृत्यु नोंदणीची पूर्ण माहिती असणे आरोग्य विभागाच्या व सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

१. मृत्यु मागच्या कारणाचा शोध घेण्याकरता व बालमृत्युचे प्रमाण कमी करण्याकरता तसेच आरोग्य कार्यक्रमाची आखणी करण्याकरता, मृत्युच्या कारणांची माहिती व टक्केवारी बनविण्याकरिता प्रतिबंधनात्मक उपाय व आरोग्य सेवा अधिक उपयुक्त करण्याकरता ही नोंद आवश्यक असते.

२. विषमज्वर, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला, पटकी व इतर साथीच्या रोगांवर नियंत्रण करण्याकरता मृत्यु नोंदणीचा उपयोग होतो.

मृत्यु नोंदणीचे फायदे

१. वारसाहक्क प्रस्थापित करण्याकरता

२. विम्याची रक्कम मिळविण्याकरता

३. मृत्युच्या कारणांची बरोबर माहिती मिळविण्याकरता

४. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळविण्याकरता मृत्युच्या दाखल्याचा उपयोग होतो.

५. मृत्युची तारीख या प्रमाणपत्रांमुळे समजू शकते.

६. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी

७. लोकसंख्येमध्ये योजना आखण्याकरता जेव्हा तुमच्या कुटुंबात जन्म अथवा मृत्युची घटना घडेल त्वरीत स्थानिक नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन घटनेची नोंदणी करून घ्या.

स्त्रोत : जन्म मृत्यू नोंदणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट