घोषवाक्ये मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या. मोळी विक, पण शाळा शिक. उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही. मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण. आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने. मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी. आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची, मी शिकेन-कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची. आता मनाशी ठरवा पक्कं, शिक्षण हा मुलींचाही हक्क. मुलगा मुलगा दोघे समान, दोघांनाही शिकवू छान. मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन. बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू. शिक्षण घेऊन होऊ विचारी, घेऊ आम्ही उंच भरारी. घडविण्या राष्ट्राचा विकास, मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास. कळी उमलणार नाही जीवनरसावाचून, मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून. लडका शान है, तो लडकी सम्मान है । शिक्षण करा गं धारण, सर्वसिद्धिचे कारण. सोडून द्या वाईट चालीरीती, आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती. लडकी होने का गम नहीं, लडकी लडके से कम नहीं । आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य. नियमितपणाची धरूया कास, मुलींना शिकवू एकच ध्यास. हम भारत की किशोरियॉं, फूल भी है और चिंगारियॉं। जब तक सुरज चॉंद रहेगा, ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा । सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध, मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद. जिच्या हाती पेन्सिल पाटी, तीच सुखाचे मंदिर गाठी. अंकूर फूलला कलिकेचा जन्म झाला, अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला. काळ बदलला तूही बदललीस, चूल-मूल ची चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस. शिक्षणाच्या दानाने बंधनाचा सोडवला फास, मुली घेत आहेत आता मोकळा श्वास. भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी, मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी. मुलासह मुलीलाही देता शिक्षण, जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण. शिक्षणाचा झाला आता कायदा, त्यामुळेच होईल मुलींचा फायदा. कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर, मुलींना करा शिक्षणाचा आहेर. नको पैसा नको सोने चांदी, मुलींनाही द्या शिकण्याची संधी. बेटा-बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान. सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार, डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार. मंत्र आहे नव्या युगाचा, मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा. स्त्रोत: शिक्षक मंच