८२-८३ मध्ये मुलांचा व्यापार आणि माणसांचा व्यापार हे शब्ददेखील अपरिचित होते. या शब्दांचे गाभिर्य आणि गुंतागुंत खुद्द कैलाश आणि त्याच्या सहकार्यांना देखील तेवढी परिचित नव्हती. एकदा पालमू नावाच्या अगदी अंतर्भागातील एका गावात कोणीतरी सांगितले की मुलांना पळवले. त्यांना गालिच्याच्या कारखान्यात डांबण्यात आले आहे.हे तरुण तेथे गेले आणि त्यांनी त्या मुलांची सुटका केली. त्या मुलांना तेथे गुलामांसारखेच ठेवण्यात आले होते. जर गालिच्याच्या वेव्हिंग आणि नॉटिंगच्या कामात काही चूक झाली तर त्याना झाडाला उलटे टांगून मारण्यात येई.

या घटनेनंतर असे झाले की अश्या घटना गावकरी त्याना कळवू लागले आणि ते त्याना सोडवून आणू लागले. उत्तर प्रदेशात गालिच्याचा फार मोठा पट्टा आहे. तेथे सर्वत्र चळवळीचे हे लोण पसरले. ७५ हजार ते १ लाख मुले अशा प्रकारे गालीच्याच्या पट्ट्यात काम करीत होती.

अशा प्रकारे ‘बचपन बचाओ आंदोलन’चा जन्म झाला होता. त्यावेळी भारतीय विधान, विचारवंतातील चर्चा, वृत्तपत्रे या सर्वांसाठी बालमजूर हा शब्द अनभिद्न्य होता. या प्रश्नात हात घालणे म्हणजे एका अशक्य गोष्टीचा विचार करणे तरी मानले जाई किवा अतिशय धोकादायक तरी मानले जाई. या पार्श्वभूमीवर बचपन बचाओ आंदोलनाची आजवरची कमाई काय? तर ८२ हजार बालकांची शोषणापासून मुक्तता, बाल मजूर आणि मानवी व्यापार विरोधी कायदे आणायला लावणे आणि भारतीय तसेच जागतिक पातळीवर या विषयांवर मोठी जनजागृती.

एखाद्या ठिकाणी गुलाम बालमजूर आहेत कळले की तेथे छापा घालून त्यांची सुटका हे तर झालेच. प्रथम हे सर्व वीटभट्ट्या, दगडांच्या खाणी, गालिच्यांचे कारखाने अशा ठिकाणी चाले. आता त्याची व्याप्ती वाढली आहे. १९९० मध्ये मुक्त झालेल्या बंधक बालमजुरांसाठी दिल्लीला ‘मुक्ती आश्रम’ या नावाने ट्रानझिट रीहॅबिलिटेशन सेंटर काढण्यात आले. तेथे नियमित शिक्षणाव्यतिरिक्त सुतारकाम, शिवणकाम, बाबू पासून वस्तू असे शिक्षण तर दिले जातेच. शिवाय प्रचलित समाजकारण-राजकारणावर चर्चा आणि नेतृत्वगुणांचा विकास हेही. १९९७ मध्ये राजस्थानमध्ये मुक्त झालेल्या बंधक बालमजुरांसाठी प्रदीर्घ शिक्षण देता येईल असे ‘बाल आश्रम’ काढण्यात आला.

१९८० मध्ये सुरु केलेले हे आंदोलन दक्षिण आशियात पसरले. आणि नंतर ते १४४ देशांत पसरून जागतिक झाले.

१९९३ मध्ये बाल मजुरांच्या प्रश्नावर व्यापक जागृती करण्यासाठी बिहार ते दिल्ली असा २००० किलोमीटर प्रचार यात्रा काढण्यात आली. १९९४ मध्ये अशीच कन्याकुमारी ते दिल्ली ५००० किलोमीटर यात्रा काढण्यात आली. १९९५ मध्ये कलकत्ता ते काटमांडू अशी दक्षिण आशियाई यात्रा काढण्यात आली.

१९९८ मध्ये बाल मजुरीला जागतिक बंदी व्हावी ही मागणी घेऊन एक ऐतिहासिक जागतिक यात्रा काढण्यात आली. त्यात १०३ देशांतील ७२ लाख लोकांनी भाग घेतला. ही यात्रा ८० हजार किलोमीटर होती. ही चळवळ जागतिक करण्यामध्ये कैलाश सत्यार्थी यांचेच निर्विवाद नेतृत्व होते. त्यासाठी आता त्यानी ‘बचपन बचाओ आंदोलना’च्या जोडीला जागतिक पातळीवर ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाईल्ड लेबर’ असे संस्थाजाळे काढले जे आजही कार्यरत आहे आणि त्याच्या नेतृत्वपदी सत्यार्थी आहेत. या संस्थाजाळ्यांत जगभरातील १४० देशांतील २००० संस्था सहभागी आहेत.

कैलाश सत्यार्थी आणि ‘बचपन बचाओ आंदोलन’ यांचे स्वप्न काय आहे? असा एक समाज निर्माण व्हावा जेथे मुलांचे शोषण नसेल आणि सर्वच मुलांना मुफ्त तसेच सर्वोत्कृष्ट शिक्षण उपलब्ध असेल. त्यासाठी बालमजुरी गुन्हा सर्वत्र ठरावा आणि सर्व स्तरांवर बालमजुरी नष्ट व्हावी. त्यासाठी समाजाच्या तळात जाऊन काम करण्यापासून देशाची सर्वोच्च धोरणे बदलण्यासाठीच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप असे सर्व मार्ग अवलंबायचे. थोडक्यात बालमजुरीचे संपूर्ण आणि समूळ उच्चाटन करणे.

लेखकः अनिल शाळीग्राम
स्त्रोत - नवी उमेद नेटवर्क