मौदा तालुक्यापासून २० कि. मी अंतरावर असलेले खात हे गाव आहे. या गावामध्ये ग्रामपंचायत असून या गावाची लोकसंख्या ५६७५ इतकी असून पुरुष ३१४५ असून महिलांची संख्या २५३० इतकी आहे. या गावामध्ये माविम स्थापित एकूण १२ बचत गट आहेत त्यापैकी SCP योजनेचे २ गट व तेजस्विनी योजनेंतर्गत ९ गट आणि SGSY चे १ आहे. या गावामध्ये गाव विकास समितीची स्थापना माहे आक्टोंबर २००९ मध्ये झालेली अहे. व सदर गटांचे खाते बँक ऑफ इंडीया खात येथे खाते उघडण्यात आले. गावामध्ये गावात जवळच विहीर आहे ती विहीर भूइसपाट होती आणि त्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरल्या जाते विहीरीचे जुने बाधकाम असल्यामुळे पाणी काढताना महिलांना भिती वाटत होती. तेव्हा CMRC च्या कार्यकारिणी बैठकीमध्ये महिलांचे काबाडकष्ट कमी करण्याचे प्रस्ताव देण्यासाठी माहिती देण्यात आली. व त्या गावच्या तत्कालिन गाव प्रतिनिधी सौ. दुर्गा नारायण गीरेपुंजे यांनी गावामध्ये गाव विकास समितीची बैठक घेऊन महिलांचे काबाडकष्ट कमी करण्याविषयीचे चर्चा करून ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामसभेमध्ये या विषयावर महिलांनी विचार् ्व्यक्त केले . तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये विहीर दुरुस्त करण्याबाबत चर्चा केली व त्या गावातील सरपंच मा. कैलासजी वैद्य यांनी महिलांच्या या प्रश्नाावर सहमती देऊन ग्रामपंचायती कडून आर्थिक सहकार्य करण्याची सहमती दर्शिवली. विहीर व बोरवेल दुरुस्तीचे काम करण्याचे गाव विकास समितीमध्ये प्रस्ताव तयार करून ग्रामपंचायतमध्ये कामाविषयी व आर्थिक मदतीची सहाय्यता मिळणे बाबत प्रस्ताव ग्रामपंचायतीला देण्यात आला. ग्रामपंचायत खात यांनी कार्यकारिणी या विषयावर चर्चा करून प्रस्ताव मंजुरात घेतला व गाव विकास समितीला काम करण्यासाठी न हरकत प्रमाणपत्र दिले. गाव विकास समितीने CMRC ला प्रस्ताव दिला व कार्यकारिणी बैठकीमध्ये ठराव मंजुर करून माविम नागपूर ला प्रस्ताव देण्यात आला. गाव विकास समितीने रू.१५०००/-लोक वर्गनी, रू.३००००/- माविम निधि व ग्रामपंचायत रू.२००००/- असे मिळून विहीर व बोरवेल दुरुस्तीचे काम करण्यात आले. विहिरीचे जमिनीपासून ३ फुट उंच बांधकाम करण्यात आले. तसेच विहिरीला दोन खिराडी तसेच विहिरीच्या आजूबाजूला भरण भरून सिमेंटीकरण करण्यात आले. तसेच बोरवेल दुरुस्तीमध्ये Hand Pump दुरुस्त करून सभोवतालचा परिसरचे सिमेंटीकरण करण्यात आले. अशा पद्धतीने गावामध्ये काम करण्यात आले. या कामामुळे गावामध्ये पिण्याचे पाणी भरण्यास सुलभ झाले तसेच Hand Pump चे पाणी भरतांना महिलांचा वेळ आणि श्रम वाचले. या कामामुळे गावामध्ये महिलांना पाणी भरणे सुलभ झाले व महिलांची बचत गटाची पत वाढली तसेच महिलांमध्ये बचत गटाद्वारे सामाजिक कार्य करण्याचा आत्मविश्वास वाढला. माविमने आर्थिक सहकार्य केल्याबाबत शतशः आभार. माहिती संकलक: प्रदीप कथोले, महिला आर्थिक विकास मांडली, नागपूर जिल्हा