आस्था लोक संचालीत साधन केंद्र नागपूर तालुका एकूण २६ गावांमध्ये काम करीत आहे. त्यामध्ये .एकूण १९३ गटांसमवेत सी.एम.आर.सी. कार्यरत असून एकूण २७७५ महिलांचा समावेश आहे.

महिलांनी संगणक प्रशिक्षणाची मागणी केल्यामुळे रायसोनी ग्रुप ऑफ एज्युकेशन, हिंगणा या संस्थेच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षणाचा लाभ एकून ९ गावा मध्ये १९६ इच्छुक महिलांना देण्यात

आजच्या युगातील महिला ही कुठेही मागे नाही महिला हया पुरूषांच्या बरोबरीने कार्यरत असून आजच्या काळातील महिला ही पुरूषांच्या बरोबरीने कार्य करीत आहे. ती आजही “चूल आणि मुल” सांभाळून पुरुषांच्या बरोबरीने आज सर्वच क्षेञातील कामं सांभाळीत आहे. आज संंगणक प्रशिक्षणाची सर्वञ मोठया प्रमाणावर गरज असल्यामुळे बचत गटातील महिलांनी पूढे जाण्याचा ध्यास घेतल्यामुळेच १९६ महिलांनी सदर संगणक प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आस्था लोकसंचालीत साधन केंद्र हे वेगवेगळया योजनाची माहिती महिलांना पुरवित असते. त्यामाध्यमातून वेगवेगळया कार्यालयांसोबत कृतीसंगम साधून देण्याचे कामसुद्धा करीत असते.

अशाच प्रकारे आस्था लोक संचालित साधन केन्द्राने रॉयसोनी ग्रुप ऑफ एज्यूकेशन हयांच्या माध्यमातून कृतिसंगम साधलेला आहे. त्याकरीता आपल्या बचत गटातील ग्रामीण महिलांना संगणक प्रशिक्षण मिळावे व संगणकाचे ज्ञान प्रत्येक गावामध्ये

गरीब, गरजू, महिला आहेत त्या महिलांना प्राप्त व्हावे हया उद्येशाने संगणक प्रशिक्षण सुरु करण्यात आले.

सदर संगणक प्रशिक्षणाकरीता दत्तवाडी, नवनितनगर, दवलामेटी, हुड्केश्वर, पिपलाफाटा, कोराडी महादुला, विकासनगर, वाडी, इत्यादी गावामध्ये संगणक प्रशिक्षण महिलांना

देण्यात आले. सदर संगणक प्रशिक्षण हे दोन महिने कालावधीचे असून MS ऑफिस हा अभ्यासक्रम महिलांना शिकविण्यात आला. त्यांची परीक्षा घेण्यात आली. व .महिलां परीक्षेमध्ये पास झाल्या त्यानंतर संगणक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा महिलांना मान्यवरांच्या शुभ हस्ते तथा संस्था संचालकांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले.

सदर संगणक प्रशिक्षणाच्या समारोपिय कार्यक्रमप्रसंगी महिलांचे मनोगत घेण्यात आले. त्यामध्ये महिलांनी सांगितले की, माउस म्हणजे काय हे आम्हाला माहित नव्हते माञ आता संगणकाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आम्हाला या प्रशिक्षणातून मिळाली. यामुळेच आम्ही आता आमच्या मुलांना संगणकाचे महत्व पटवून देत आहे. तसेच त्यांना देखील संगणक येणे ही काळाची गरज असून त्या माध्यमातून त्यांनी देखील हया प्रगत ज्ञानाचा स्विकार कराव असे मत महिलांनी प्रतिपादीत केले आहे ..```संगणक ही काळाची जननी, उज्ज्वल भ्वितव्याची गुरूकिल्ली``

माहिती संकलक: प्रदीप कथोले, महिला आर्थिक विकास मांडली, नागपूर जिल्हा