आया बायांनो, आया बायांनो नका करू कालबा ग..... रडते गौरी माझी पाळणा हलवा ग....!! माझ्या गौरीचे करू नका हाल ग... रडून रडून डोळे तिचे झाले लाली लाल ग... तिची दृष्ट कुणी तरी काढा ग....... गौरी माझी पाळणा कुणी हलवा ग....!! माझ्या गौरीला प्रेम तुम्ही दया ग.... गौरी माझ्या वंशाचा दिवा ग... नका करू नका करू तिचा भेदभाव ग..... रडते गौरी माझी पाळणा कुणी हलवा ग....!! आई तीच, बहिब तीच, तीच पत्नी ग... तिच्या हाती देवू शिक्षणाचा वसा ग... नका करू नका करू तिची छेडछाड ग.... रडते गौरी माझी पाळणा कुणी हलवा ग...!! आय बायांनो नका करू कालवा ग... रडते गौरी माझी पाळणा कुणी हलवा ग....!! लेखनः मनिषा गौतम भालेराव, पिंपरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर