क्षेत्रलाभार्थीफायदेअर्ज कसा करावा ? क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी: दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट (अ) रु.400/- प्रतिमहा निवृत्तीवेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा असे एकूण रुपये 600/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. फायदे: प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.600/- अदा करण्यात येते. अर्ज कसा करावा अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव-जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance स्रोत:- महाराष्ट्र शासन