उद्देश व स्वरुप अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे याकरिता इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात आहे. अशा शाळेत इ. 5 वी ते इ. 10 वी पर्यंत शिक्षण देण्यात येते. अशा इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळा 1) पेठरोड, नाशिक, जि. नाशिक. 2) बोर्डी ता. डहाणू, जि. ठाणे 3) तालुस्ते (बडनेरा) ता. नांदगांव खांडेश्वर 4) चिखलदरा, ता. धारणी, जि. अमरावती 5) खैरी परसोडा, ता.जि.नागपूर येथे आहेत. सुविधा अशा निवासी शाळेत विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था, भोजन, गणवेश, आंथरुण, पांघरुण, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत. पात्रता विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा ्इत्यादी शाळांमध्ये इ. 4 थी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. स्पर्धा परीक्षा एप्रिल मे मध्ये त्या-त्या जिल्हयातील आदिवासी प्रकल्प क्षेत्रात घेण्यात येतात. संपर्क संबंधित शाळांचे मुख्याध्यापक. पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक. स्त्रोत: आदिवासी विकास विभाग