अ.क्र.योजनासविस्तर माहिती १ योजनेचे नाव : जिल्हा पातळीवर बंदिस्त नाट्यगृह बांधण्यास अर्थसहाय्य योजना. २ योजने बद्दलचा शासन निर्णय : शा.नि.क्र.नागृबा-2015/प्र.क्र.85/सा.का.1 दि.29 फेब्रुवारी 2016. ३ योजनेचा प्रकार : अर्थसहाय्याची योजना. ४ योजनेचा उद्देश : ज्या जिल्हयात बंदिस्त नाट्यगृह अस्तित्वात नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये नवीन बंदिस्त नाट्यगृह बांधणे. ५ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : निश्चित असा प्रवर्ग नाही. ६ योजनेच्या प्रमुख अटी : नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम जास्तीत जास्त दोन वर्षाच्या कालावधीत पुर्ण करणे अनिवार्य असेल. संस्थेने व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीसाठी राखीव निधी निर्माण करणे आवश्यक राहील. ७ आवश्यक कागदपत्रे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाकडून प्रमाणित केलेले नाट्यगृह बांधकामाचे अंदाजपत्रक व नकाशे. नाट्यगृह बांधण्याचा व पुढे त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचा ठराव. जमीनीची मालकी सिध्द करणारी कागदपत्रे इ. ८ दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : आर्थिक ९ अर्ज करण्याची पद्धत : सबंधित जिल्हाधिकारी यांनी विभागास अर्ज सादर करावा. १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : प्रकरणपरत्वे निश्चित नाही. ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : सबंधित जिल्हाधिकारी कार्यालय. स्रोत : महायोजना, महाराष्ट्र शासन