Accessibility options
Accessibility options
Government of India
Table of contents
Contributor : अतुल यशवंतराव पगार26/11/2019
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ म्हणून पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांनी सन 2007 पासून पंचायत महिला शक्ती अभियान हा कार्यक्रम सुरु केला आहे.
पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य सहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियांनांतर्गत विभाग निहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.
पंचायत महिला शक्ती अभियांनातर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्हयातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा 33 जिल्हयातून प्रत्येकी 3 अशा 99 सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या 99 सदस्यांतून 18 प्रतिनधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते. अशा प्रकारचा लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ देशात प्रथम महाराष्ट्र राज्याने स्थापित केला आहे.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, प्रत्येक जिल्हयात एक युनिट स्थापन करण्यात येते. संघात समाविष्ट असलेल्या जिल्हयातील 3 महिला तसेच सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) या 5 जणांचा युनिटमध्ये समावेश आहे. सदर युनिटची बैठक दर 2 महिन्याने जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली होते.
संघाच्या कार्यकारीणीची मुदत 2 वर्षांची आहे. संघाच्या कार्यकारीणीची दर तिमाही बैठक बोलाविणे आणि त्या बैठकांचे समन्वय करणे यासाठी समन्वयक म्हणून यशदा, पुणे येथे पंचायत महिला शक्ती अभियान हाताळणारे सहयोगी प्राध्यापक हे कामकाज पाहतात. कार्यकारीणीची बैठक दर 3 महिन्यातून घेणे तसेच संघातील सर्व महिला लोकप्रतिनिधींची परिषद वर्षातून एकदा घेणे ही समन्वयक यांची जबाबदारी आहे.
“ग्रामसभा” ही ग्रामीण लोकशाही व्यवस्थापनातील ग्रामस्तरावरील सर्वोच्च यंत्रणा आहे. देशाचा ख-या अर्थाने विकास करण्यासाठी ग्रामसभांचे मजबूतीकरण होणे आवश्यक आहे.
ग्रामसभेमध्ये सदस्य या नात्याने महिला ह्या ग्रामसभेच्या घटक आहेत.
रेशीम उद्योग हा कृषी व वनस्पती संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाधिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी “महाराजस्व अभियान”
अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अंड ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) अभियान
स्त्री! एका चौकटीत बंदिस्त... चौकट परंपरांची, चौकट समाजाची, चौकट जबाबदाऱ्यांची, चौकट दुबळेपणाची... पण ही चौकट मोडत महाराष्ट्रातील काही महिला हिमतिने लढल्या.
Contributor : अतुल यशवंतराव पगार26/11/2019
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
66