भारताचे पंतप्रधान यांनी त्यांच्या १५ ऑगस्ट २०१४ रोजी केलेल्या भाषणात ’सांसद आदर्श ग्राम योजने’चा उल्लेख केला होता. या योजनेनुसार प्रत्येक सांसदाने (खासदाराने) आपाआपल्या क्षेत्रात एक गाव दत्तक घेऊन ते २०१६ सालापर्यंत आदर्श करून दाखवयाचे आहे. शिवाय त्याने २०१९सालापर्यंत दोन गावे आदर्श केली असावीत, अशी अपेक्षा आहे. या योजनेसाठी ’जनभागीदारी’ आवश्यक आहे.

११ ऑक्टोबर २०१४ला या योजनेचा शुभारंभ झाला.

असे असेल आदर्श ग्राम

सांसद आदर्श ग्राम योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून, अल्पकाळातील कामे तीन महिन्यात पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये गावची स्वच्छता, अंगणवाडीत मुलांचा प्रवेश, गावात झाडे लावणे आणि आरोग्य सुविधा पुरवणे या सारखे कामे करावी लागणार आहेत. तर मध्यम मुदतीची कामे एक वर्षात आणि दीर्घ मुदतीची कामे वर्षापेक्षा अधिक काळता पूर्ण करावी लागणार आहेत. विशेष बाब म्हणजे गावाचा वाढदिवसही साजरा करण्यात येणार असून, त्यादिवशी गावाबाहेरील व्यक्तिंना बोलवून त्यांचा सन्मान करणे, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याची जबाबदारीही खासदाराचीच असणार आहे.

येजनेची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत खासदार, अधिकारी आणि पंचायती प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

संसदेच्या दोन्ही सभागृहातील 795 खासदारांनी मिळून 2016 पर्यंत 795 गावे आदर्श बनवावित. प्रत्येकवर्षी एक गाव यानुसार 2014ते 2024 पर्यंत देशातील सहा लाख गावांपैकी जवळपास 6 हजार 360 गाव आदर्श बनतील.

संदर्भ : तरुण भारत

संकलन : छाया निक्रड