अ.क्र.योजनासविस्तर माहिती १ योजनेचे नाव : महाराष्ट्र राज्यातील वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना २ योजने बद्दलचा शासन निर्णय : वृकमा 2012/प्र.क्र.117/सां.का.4, दि. 7 फेब्रुवारी, 2014 ३ योजनेचा प्रकार : मानधन योजना ४ योजनेचा उद्देश : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे. ५ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व ६ योजनेच्या प्रमुख अटी : साहित्य कला किंवा वाड्.मय क्षेत्रात 15 ते 20 वर्षे या कालावधीत महत्वपूर्ण कामगिरी ७ आवश्यक कागदपत्रे : साहित्य कलाक्षेत्रातील पुरावे, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला ८ दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : अ वर्ग- रु.2,100/- प्रति माह ब वर्ग – रु.1,800/- प्रति माह क वर्ग- रु.1,200/- प्रति माह ९ अर्ज करण्याची पद्धत : गट विकास अधिकारी / समाज कल्याण अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 3 महिने ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, 1 ला मजला, एम. जी. रोड, मुंबई 400 032. स्रोत : महायोजना, महाराष्ट्र शासन