सफाई कामगार पुनर्वसन योजना – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित राष्ट्रीय स्तरावर अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून, या योजनेत रू.5 लाखापर्यंत अर्थसहाय्य केले जाते. हे अर्थसहाय्य सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाकडून केले जात असून जिल्ह्याच्या ठिकाणी ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे राबविली जाते. व्यवस्थापकीय संचालक, जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, 1 ला माळा, गुलमोहर क्रॉस रोड नं. 9, जे.व्ही.पी.डी.स्कीम, विलेपार्ले (प), मुंबई – 400 049. दुरध्वनी क्रमांक 022-26202588022-26202588 , 26202586 यंत्रणेचे नाव महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोणासाठी अनुसूचित जाती किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता नाही वयोमर्यादा (वर्षे) 18 ते 45 लिंग पुरूष / महिला कार्यक्षेत्र ग्रामीण / शहरी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (ग्रामीण भागासाठी) आवश्यकता नाही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (शहरी भागासाठी) आवश्यकता नाही ठळक वैशिष्ठये स्वच्छतेच्या कामाकरिता उपयोगात येणारे वाहन व इतर साहित्य निर्मितीकरिता विशेष बाब म्हणून रु.10.00 लाखांपर्यंत कर्ज 8% व्याजदराने दिले जाते. प्रकल्पाच्या संपूर्ण रक्कमेपैकी 75% रक्कम राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ व 20% रक्कम महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत देण्यात येते. कमाल कर्जमर्यादा रू. 5.00 लाख बँकेचा सहभाग व व्याजदर नाही स्वतःचा सहभाग 5% यंत्रणेचा सहभाग व व्याजदर 95% व व्याजदर 4% व 6% प्रमाणे अनुदान Rs.10000/- तारण यंत्रणेच्या नियमानुसार इ. एम. आय. यंत्रणेच्या नियमानुसार परतफेडीची सुरूवात 3 महिन्यानंतर किंवा व्यवसायानुसार परतफेडीचा कालावधी 60 महिने शेरा राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ च्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्यास 2% दंडव्याज आकारण्यात येते. उमेदवाराचा स्वतःचा सहभाग 1 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंत निरंक व त्यापुढे 5% असतो. संकलन - अमरीन पठाण Call Send SMS Call from mobile Add to Skype You'll need Skype CreditFree via Skype