प्रकल्प तपशिल

प्रकल्प मर्यादा रु.५ लाखापर्यंत, ज्यात रु. ३ लाखांच्या वर मालमत्ता निर्माण होईल.

राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग ४०%, राज्य महामंडळाचा सहभाग ५% ,लाभार्थींचा सहभाग ५% व बँकेचा सहभाग ५०%

परतफेडीचा कालावधी ५ वर्षे

महामंडळाच्या कर्जावर ६% दराने व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या दराने व्याज

अर्जदार लाभार्थीची अर्हता

लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असावा.

त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.

तो कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

बीज भांडवल योजने व थेट कर्ज योजनेकरिता शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,०००/- पेक्षा कमी असावे.

राष्ट्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,०००/- पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,०००/- पेक्षा कमी असावे.

कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल

उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती. २.जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, पासपोर्ट साईज फोटो.

व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.

शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.

२ जामिनदारांची प्रमाणपत्रे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ना हरकत प्रमाणपत्र” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतीज्ञापत्र.

तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स. ८.व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

सूचना :- अर्जदाराने मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

स्रोत - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित